इतिहासात पहिल्यांदाच देऊळ बंद!

Foto
 प्रतिपंढरपूर ला यंदा कोरोनाचे संकट पसरलेले आहे. त्यामुळे प्रतिपंढरपूर वाळूज येथील विठ्ठल रुख्मिणी मंदिरात महापूजा आणि अभिषेक करून आरती करण्यात आली. अशी माहिती श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिर संस्थानचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी दैनिक सांजवार्ताशी बोलताना दिली.
दरवर्षी मोठ्या प्रमाणात आषाढी एकादशीला जिल्ह्यातील भक्त दर्शनासाठी गर्दी करत असतात. विविध ठिकाणच्या दिंड्या प्रतिपंढरपूरला येतात. शहरातील हजारो भक्त प्रतिपंढरपूरला दर्शनासाठी पाई जातात. यावेळी टाळ, मृदंगचा आवाजात विठ्ठल नामाचा गजर करत पारंपरिकतेचे दर्शन घडविले जाते. यावेळी वारकरी मंडळींनी या ठिकाणी विठ्ठलाचा गजर करतात.
 परंतु यावर्षी कोरोनामुळे भक्तांना दर्शनासाठी जाता आले नाही. त्यामुळे शहरातील नागरिकांना घरीच विठ्ठलाचे नामस्मरण करण्यात आले. तसेच प्रतिपंढरपूरला फक्त आठ भजनी मंडळींनी भजन करत विठ्ठलाचा गजर केला. तसेच मध्यरात्री एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक मधुकर सावंत यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. तसेच पहाटे पंढरपूरचे ग्रामसेवक नारायण रावते, चंद्रकला रावते यांच्या हस्ते पूजा करून आरती करण्यात आली. त्यानंतर मंदिर बंद करण्यात आले. 
यासाठी मंदिराचे अध्यक्ष राजेंद्र पवार, सचिव भिकाजी खोतकर, आप्पासाहेब झळके, विठ्ठलराव वाकळे, रत्नाकर शिंदे, पांडुरंग कुलकर्णी, हरीश साबळे, कृष्णा झळके, हरिभाऊ शेळके, बंकटलाल जैस्वाल सह आदींनी सहकार्य केले. 
कळसपूजन करून विठ्ठलाचा गजर
यावर्षी कोरोनामुळे मंदिरात केवळ औपचारिक पद्धतीने पूजा, अभिषेक करण्यात आला. तसेच वाळूज-पंढरपूर भागातील काही भक्तांनी आज सकाळपासून केवळ मंदिराच्या कळसाचे दर्शन घेत विठ्ठलनामाचे स्मरण करण्यात आले. यावेळी भक्तांनी बाहेरूनच दर्शन घेतले. यावेळी माऊली..माऊली, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला.. असा जयघोष करण्यात आला.