विकास अन् पर्यावरण दोन्ही जपणार
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) नगर नाका ते दौलताबाद टी पॉइंट मार्ग रुंदीकरणासाठी होणाऱ्या वृक्षतोडीचा वाद अखेर निवळण्याची चिन्हे आहेत. शेकडो जुनी झाडे तोडण्यावरून पर्यावरणप्रेमींनी तीव्र संताप व्यक्त केल्यानंतर, प्रशासनाने यावर तोडगा काढत वृक्षतोड
कमी करण्यासाठी पर्यायी मार्ग आणि अलाइनमेंटमध्ये बदल करण्याचे संकेत दिले आहेत. यामुळे ऐतिहासिक व देशी वृक्षांचा जीव वाचण्याची शक्यता निर्माण झाली असून, विकास कामांसोबतच पर्यावरणाचा समतोल कसा राखला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
५०० वडाच्या वृक्षलागवडीचे नियोजन
रस्ता रुंदीकरणाचे काम नियोजनानुसार सुरू आहे. प्रकल्पासाठी ६९४ झाडे तोडावी लागणार असली, तरी पर्यावरणाची भरपाई देण्यासाठी प्रत्येक वडाच्या झाडाच्या मोबदल्यात दहा वडाची झाडे लावली जात आहेत. सुमारे ५०० वडाची लागवड करण्याचे नियोजन आहे. शुक्रवारी झाडाची फांदी कापताना जेसीबी कोसळला; सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
नगर नाका-दौलताबाद मार्गाच्या सहापदरीकरणाचा प्रस्ताव यापूर्वीच चर्चेत आला होता. या मार्गावर ५० ते १०० वर्षे जुन्या वृक्षांची संख्या मोठी असल्याचे दिसून आले आहे. २०२४ मध्ये उपलब्ध
माहितीनुसार या पट्ट्यात ७१ वड, २२५ कडुनिंब, ५० शिसम, ४० महारुख आणि ४० काशीद अशी झाडांची नोंद असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे केवळ रस्ता रुंदीकरणासाठी पर्यायी आराखडा किंवा वृक्ष
वाचविण्याच्या उपाययोजनांचा विचार करावा, अशी मागणी पर्यावरणप्रेमींनी केली होती. याप्रकरणी पर्यावरणप्रेमींनी राष्ट्रीय हरित लवादाकडे धाव घेतली आहे. वृक्षतोडीच्या प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित
शेषराव चव्हाण, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग
करत याचिका दाखल केली असून, लवादाने याप्रकरणाची दखल घेतली. मात्र त्यानंतरही रस्त्यावरील वृक्षतोड सुरू असल्याने भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. प्रशासनाच्या
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions












