गंगापूर, (प्रतिनिधी) : तालुक्यात दुष्काळाने रौद्र रूप धारण केले असून, तालुक्यातील असलेला शिल्लेगाव मध्यम प्रकल्प पूर्णपणे कोरडाठाक पडला आहे. त्यातच तालुक्यातून वाहणाऱ्या शिवना नदीच्या पात्रातून अवैध वाळू उपसा जोरात सुरू असल्याने पिण्याच्या पाणीपुरवठा योजनांच्या विहिरींनी तळ गाठला आहे.
शिवना नदीपात्रात अनेक ग्रामपंचायतींच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना आहेत. या योजनांच्या विहिरी
शिवना नदीत अवैध वाळू उपशामुळे विहिरी आल्या नदीपात्रातच आहेत. मात्र, दिवसरात्र जेसीबी आणि टिप्परच्या साह्याने बेसुमार वाळू उपसा सुरू असल्याने नदीचे पात्र खोदून काढले गेले आहे. त्यामुळे भूजल पातळी खोल गेली असून, या विहिरी कोरड्या पडल्या आहेत. नागरिकांनी अनेकदा तक्रारी करूनही महसूल व पोलीस प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे.
-- परिस्थितीचे ५ गंभीर मुद्दे --
पिण्याचे पाणी शिल्लेगाव प्रकल्प कोरडा, शिवना नदीतील वाळू उपशामुळे पाणीपुरवठा योजनांच्या विहिरी आटल्या.
९० टक्के विहिरी कोरड्या, ड्रम १५० रुपयांना. जनावरांना चारा शेतात चाराच नाही, शिवना काठचा गायरान भागही वाळू माफियांनी उद्ध्वस्त केल्याने चाराटंचाई अधिक तीव्र. नागरिकांना काम नाही शेती बुडाली, नदीकाठची रोजगार हमीची कामे बंद, मजुरांवर उपासमारीची वेळ. तरुण नोकरीसाठी परेशान पाणी नाही, काम नाही म्हणून शहराकडे स्थलांतर वाइल प्रशासनाचे एक दुष्काळ, दुसरीकडे शिवना नदीत अवैध वाळू तस्करीला प्रशासनाचा आशीर्वाद असल्याची चर्चा. वाळूमाफियांवर कारवाई नाही, नागरिक पाण्यासाठी वणवण भटकत आहेत. शिवना नदीतील अवैध वाळू उपसा तात्काळ थांबवून पाणीपुरवठा विहिरींना संरक्षण द्यावे आणि तालुक्याला दुष्काळग्रस्त जाहीर करून विशेष पॅकेज द्यावे, अशी मागणी होत आहे.















