गंगापूर, (प्रतिनिधी): तालुक्यातील राजकारणात मोठी खळबळ उडवणारी घटना शिवसेना (उद्धव ठाकरे गट) चे उपजिल्हाप्रमुख आणि गंगापूर नगर पालिकेचे माजी नगरसेवक अविनाश पाटील यांनी आज भाजपात जाहीर प्रवेश केला आहे.
हा प्रवेश आमदार प्रशांत बंब यांच्या उपस्थितीत झाला असून, यामुळे उद्धव ठाकरे गटाला गंगापूर तालुक्यात मोठे खिंडार पडले आहे. गंगापूर नगर पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घडामोडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे की येणाऱ्या गंगापूर नगरपालिकेच्या निवडणुकीत अविनाश पाटील यांना भाजपाकडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळणार आहे.
त्यामुळे गंगापूरमधील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजपात प्रवेशानंतर अविनाश पाटील यांनी म्हटले, भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये या प्रवेशामुळे काही नाराज तर काही उत्साह निर्माण झाला असून, गंगापूरमधील नगर परिषदेच्या निवडणुकीचे वातावरण आजपासूनच तापले आहे.
भाजपमध्ये प्रवेश :
शिवसेना (उद्धव ठाकरे गट) चे उपजिल्हाप्रमुख आणि गंगापूर नगर पालिकेचे माजी नगरसेवक अविनाश पाटील यांनी आज भाजपात जाहीर प्रदेशमध्ये कांता टेमकर, संतोष जोशी, श्रीलाल गायकवाड, अजित अर्जुन राजपूत, गणेश राजपूत, गोविंदे वल्ले, किरण वल्लो, रमेश वारकरी, भोसले यांनी प्रवेश केला आहे. गंगापूरचे राजकारण आता नव्या वळणावर भाजपाच्या रणनीतीला बळ मिळणार, तर उद्धव गटात नाराजीचे सूर दिसत आहेत.
राजकीय समीकरणांमध्ये मोठे
बदल होण्याची शक्यता :
भाजपकडून नगराध्यक्षपदाच्या दावेदारीसाठी अविनाश पाटील यांचे नाव चर्चेत आहे. त्यामुळे गंगापूरच्या राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे.














