पैठण येथे सोमवारी २४ वा भगवान महावीर यांचा जन्मकल्याणक महोत्सव साजरा होणार

Foto
पैठण, (प्रतिनिधी) : सकल जैन समाजाच्या वतीने ३० मार्च रोजी सोमवारी जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांचा जन्मकल्याणक महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर पैठण येथील जैन मंदिरात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
या बैठकीस महामंत्री विलास पहाडे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात बैठक घेण्यात आली आहे. महोत्सवाच्या नियोजनात त्यांचे मार्गदर्शन व नेतृत्व विशेष ठरले. 

त्यांच्या पुढाकारातूनच महोत्सवाच्या विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले असून कार्यकर्त्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. बैठकीत
महोत्सव कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्यानुसार अध्यक्षपदी सचिन पहाडे यांची निवड करण्यात आली असून उपाध्यक्षपदी
शीतल कासलीवाल, तर सचिवपदी विशाल काला यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

यावर्षीच्या महोत्सवाला विमल सागरजी महाराज यांच्या शिष्या विमल प्रभा माताजी यांची विशेष उपस्थिती लाभणार असून, भगवान महावीर यांच्या प्रतिमेच्या रथाचा शुभारंभ पैठण तालुक्याचे आमदार विलास बापू भुमरे यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. यावेळी पैठण नगर परिषदेच्या नगराध्यक्ष विद्या भूषण कावसानकर, उपनगराध्यक्ष तुषार पाटील, उपविभागीय महसूल अधिकारी
नीलम बाफना, पैठणच्या तहसीलदार ज्योती पवार, नगर परिषदेच्या मुख्याधिकारी डॉक्टर पल्लवी अंभोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.

महोत्सवानिमित्त सकाळी ८ वाजता महावीर स्तंभापासून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. तसेच विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीस विजय पापडीवाल, किशोर भाकरे, नरेंद्र बडजाते, पवन चांदीवाल, रोहित ढोले, महावीर भूस, अनिल पहाडे, राहुल पाटणी, अभिजीत काला, स्वदेश पांडे, सुमित गंगवाल आदी मान्यवर उपस्थित होते. महोत्सवानिमित्त महाप्रसादाचे आयोजन नरेंद्र मदनलाल बडजाते यांच्या वतीने करण्यात येणार असल्याची माहिती महामंत्री विलास पहाडे यांनी दिली आहे.