चिकलठाणाच्या राजाची ४३ वर्षांची परंपरा

Foto

उज्ज्वला साळुंके
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्यूरो): गणेशोत्सवाचा आनंद आणि उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. चिकलठाणा येथील चिकलठाणाचा राजा म्हणून ओळखला जाणारा श्री सावता गणेश मंडळ गेल्या ४३ वर्षांपासून गणेशोत्सवाची परंपरा जोपासत आहे. यंदा सव्वा एकर परिसरात साकारलेल्या जगन्नाथपुरी मंदिराच्या देखाव्यामुळे शहराचे मुख्य आकर्षण ठरणार असल्याची माहिती मंडळाचे सदस्य संजीव डोळस आणि निलेश कावडे यांनी दैनिक सांजवार्ताशी बोलताना दिली.
यंदा जगन्नाथपुरीचे घडणार दर्शन; गणेशोत्सवात देखाव्यासह विविध उपक्रम
बाप्पा मोरया
चिकलठाणाचा राजा म्हणून संपूर्ण शहरात ओळखल्या जाणाऱ्या सावता गणेश मंडळाने यंदाही आपल्या देखाव्याची परंपरा कायम ठेवली असून, यंदा शहरवासीयांना थेट जगन्नाथपुरीचे दर्शन घडणार आहे. आगमन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला असून देखावा तयार करण्यासाठी कारागीर अहोरात्र मेहनत घेत आहेत. तसेच दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना महाप्रसाद तसेच रक्तदान शिबिरासह विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. ही परंपरा यंदाही कायम ठेवली जाणार आहे.
शहरवासीयांसाठी मंदिराच्या प्रतिकृती सावता गणेश मंडळाच्या देखाव्यांची परंपरा आजची नसून ती अनेक वर्षांपासून जोपासली आहे. या मंडळाने सजीव आणि निर्जीव देखाव्यांच्या
आतापर्यंत अनेक मंदिराचे घडविले दर्शन
गेल्या काही वर्षात या मंडळाने बलाजी मंदीर, केदारनाथ, बद्रीनाथ, माता वैष्णवी यांसारख्या धार्मिक स्थळांच्या प्रतिकृती साकारून लाखो भाविकांचे लक्ष वेधून घेतले आहे. यंदा चार धामपैकी एक धाम समजले जाणारे जगन्नाथपुरी मंदिर हे हिंदूचे पवित्र धार्मिक स्थळ आहे. चिकलठाण्यातील सावता गणेश मंडळाने सव्वा एकर परिसरात या मंदिराची हुबेहूब आणि भव्य प्रतिकृती उभारली आहे. शहरवासीयांना त्यामुळे जगन्नाथपुरीचे दर्शन घडणार आहे.
माध्यमातून गणेशोत्सवात विविध पौराणिक विषय सादर करण्यास सुरुवात केली होती.
त्याकाळी सजीव देखाव्यांना भाविकांची विशेष पसंती मिळत असे. सुरुवातीच्या काळात मंडळाने समुद्रमंथन आणि सीता स्वयंवर यांसारखे अप्रतिम देखावे सादर करून आपली वेगळी ओळख निर्माण केली. मात्र श्री सावता गणेश मंडळाने काळानुरूप बदल करत देखाव्यांना एक नवे रूप दिले. मंडळाने देशभरातील प्रसिद्ध धार्मिक स्थळांच्या प्रतिकृती साकारण्याचा निर्णय घेतला. जे भाविक आर्थिक किंवा इतर कारणांमुळे दूरवरच्या तीर्थक्षेत्रांना भेट देऊ शकत नाहीत, त्यांना आपल्या शहरातच त्या पवित्र तीर्थक्षेत्राच्या दर्शनाची अनुभूती मिळावी, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.