संसर्गाची स्थिती आणि उपाययोजना याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्ह्याचा आढावा घेणार आहेत. सायंकाळी सातच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात सदर व्हीसी विषय होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कोरोना संसर्गाची लागण आता ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पसरू लागली आहे. अँटीजन टेस्ट मुळे शहरात कमी झाली झालेला संसर्ग गेल्या दोन-तीन दिवसात पुन्हा वाढला आहे. अशा परिस्थितीत प्रशासनाच्या उपाययोजनांची माहिती आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हिडिओकॉन कॉन्फरन्सच्या माध्यमातून घेणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात सायंकाळी सातच्या सुमारास मुख्यमंत्री आढावा घेणार असून जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा आयुक्त अस्तिक कुमार पांडे, सीईओ डॉ. मंगेश गोंदावले, घाटीच्या अधिष्ठाता कानन येळीकर, जिल्हा शल्यचिकित्सक सुंदर कुलकर्णी, मनपाच्या वैद्यकीय अधिकारी नीता पाडळकर आदींची यावेळी उपस्थिती राहणार आहे.