रखडलेल्या कामांचा मार्ग मोकळा; सोमवारपासून निविदा प्रक्रिया
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्यूरो): मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे गेली महिनाभर ब्रेक लागलेल्या महापालिकेच्या विकासकामांना आता पुन्हा एकदा गती मिळणार आहे. शुक्रवारी (दि.३०) ही आचारसंहिता अधिकृतपणे संपल्यामुळे प्रशासनावरील निर्बंध हटले आहेत. परिणामी, शहरातील विविध भागांत रखडलेली नागरी कामे, निविदा प्रक्रिया आणि नवीन प्रकल्पांच्या कामांचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला आहे.
महापालिका निवडणूक होऊन नऊ महिने लोटले तरी अद्याप प्रभागांमध्ये हवी तशी विकासकामे सुरू झालेली नाहीत, अशी नगरसेवकांची ओरड होती. आता आचारसंहितेचे बंधन दूर झाल्याने नगरसेवकांमधील आणि नागरिकांमधील प्रतीक्षा संपली असून,
नगरसेवकांना करावा लागत होता रोषाचा सामना
▶ महापालिका निवडणूक होऊन नऊ महिन्यांचा काळ लोटला, तरी प्रभागात कोणतीही मोठी कामे सुरू न झाल्याने नगरसेवकांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत होते. मात्र, आता आचारसंहिता संपल्याने आणि सोमवारपासून निविदा प्रक्रिया सुरू होणार असल्याने रखडलेल्या विकासकामांचा श्रीगणेशा होणार असून, नगरसेवकांचा जीव भांड्यात पडणार आहे.
सोमवारपासून या कामांच्या निविदा प्रसिद्धीची प्रक्रिया सुरू होईल. आचारसंहितेच्या काळात प्रशासनाने विकासकामांची अंदाजपत्रके तयार करून ही कामे आता निविदा प्रक्रियेपर्यंत पोचली आहेत. त्यानुसार, येत्या सोमवारपासून शहरातील विविध विकासकामांच्या निविदा प्रसिद्ध करण्यास सुरवात होणार आहे. सध्या महापालिकेत सुमारे ३० ते ३५ कोटी रुपयांची कामे पाइपलाइनमध्ये असून, कामांची
एकूण संख्या शंभराच्या घरात असणार आहे. या विकासकामांमध्ये प्रामुख्याने जनतेच्या जिव्हाळ्याच्या आणि मूलभूत समस्यांशी निगडित असलेल्या कामांवर भर देण्यात आला आहे. शहरातील खराब व खड्डेमय रस्त्यांच्या दुरुस्तीची व नवीन कामांची मोठी संख्या आहे. अनेक भागांत रखडलेली ड्रेनेज लाईन दुरुस्तीची कामे तातडीने हाती घेतली जाणार आहेत.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions














