सागर प्रकाशनचे
साजवार्ता
Page No.: 3 Date: 29/11/2026
रुग्णवाहिका चालक व वैद्यकीय कर्मचाऱ्यांशी साधला संवाद
-
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी छत्रपती संभाजीनगर आरोग्य संवाद यात्रेदरम्यान १०८ रुग्णवाहिकेतून स्वतः प्रवास करून रुग्णवाहिका सेवेची प्रत्यक्ष पाहणी केली. रुग्णांना आपत्कालीन परिस्थितीत उपलब्ध होणाऱ्या सुविधा, रुग्णवाहिकेचा प्रतिसाद वेळ आणि वैद्यकीय सेवेची गुणवत्ता जाणून घेण्याच्या उद्देशाने त्यांनी हा उपक्रम राबविला.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे, आमदार प्रशांत बंब, आरोग्य सेवा संचालक डॉ. विजय कंदेवाड, उपसंचालक आरोग्य सेवा डॉ. कांचन वानेरे, सहाय्यक संचालक हिवताप डॉ. रेखा भंडारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय
धानोरकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कमलाकर मुदखेडकर यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचरी उपस्थित होते.
मंत्री आबिटकर यांनी रुग्णवाहिकेतील ऑक्सिजन सुविधा, स्ट्रेचर, प्रथमोपचार संच, औषधसाठा तसेच प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचाऱ्यांकडून पुरविण्यात येणाऱ्या सेवांची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी स्वतः रुग्णवाहिकेतून लासूर स्टेशन ते गंगापूर असा प्रवास केला. या प्रवासादरम्यान रुग्णवाहिका चालक आणि आपत्कालीन वैद्यकीय तंत्रज्ञ यांच्याशी संवाद साधून सेवा बजावताना येणाऱ्या अडचणी, रुग्णांना वेळेत रुग्णालयात पोहोचविताना उद्भवणाऱ्या समस्या आणि आवश्यक सुविधांबाबत माहिती जाणून घेतली.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions














