भारतीय जवानांनी थेट चिनी अधिकार्‍यालाच उचलले...

Foto
गेल्या आठवड्यात चीन सैन्यासोबत भारतीय जवानांची झटापट झाली. सीमेवर आगळीक करणार्‍या चिनी सैन्याला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलं.15 जूनच्या रात्री झालेल्या झटापटीवेळी घडलेल्या घटना आणि भारतीय जवानांचे पराक्रम आता समोर येऊ लागले आहेत. भारतीय जवानांनी अतुलनीय शौर्य दाखवत चीनचे मनसुबे धुळीस मिळवले. रात्रीच्या अंधारात झालेल्या झटापटीत पारताचे काही जवान चिनी सैन्याच्या हाती लागले. त्यांची वाटाघाटीनंतर सुटका झाली. तर चीनचे काही सैनिक आणि एक अधिकारीदेखील भारताच्या ताब्यात होता. दरम्यान  भारत आणि चीनमध्ये आता कमांडर पातळीवर चर्चा केली जात आहे. ही बैठक प्रत्यक्ष ताबारेषेच्या पलिकडे चीनच्या भूमीत मोल्डो येथे होत आहे. त्यात लडाखमधील संघर्षाबद्दल चर्चा केली जाणार आहे.
6जूनला झालेल्या बैठकीतील निर्णयांची अंमलबजावणी होतेय का, हे पाहण्यासाठी भारतीय जवानांची तुकडी 15 जूनला गलवान भागात गेली होती. बैठकीत ठरल्याप्रमाणे चिनी सैन्यानं या भागातील पोस्ट हटवावी, असं आवाहन जवानांकडून करण्यात आलं. मात्र चिनी सैन्यानं कर्नल संतोष बाबू यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर भारतीय जवान संतापले आणि त्यांनी चिनी सैन्याला झोडपून काढण्यास सुरुवात केली. बिहार रेजिमेंट आणि पंजाब रेजिमेंटच्या जवानांनी चिनी सैन्यावर हल्ला चढवला. रात्री अंधार असल्यानं फारसा अंदाज येत नव्हता. मात्र या परिस्थितीतही शीख सैनिकांनी योग्य अंदाज घेत चिनी अधिकार्‍याला ताब्यात घेतलं. त्या अधिकार्‍याला थेट उचलून आणण्यात आलं. एबीपी न्यूजनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. पंजाब रेजिमेंटचे जवान पराक्रम गाजवत असताना बिहार रेजिमेंटचे जवानही त्यांच्या बरोबरीनं लढत होते. बिहार रेजिमेंटच्या जवानांनी अनेक चिनी जवानांच्या माना मोडल्या. बाबू यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर भारतीय जवान चिनी सैन्यावर अक्षरश: तुटून पडले.
भारत आता चीनच्या भूमीत जाऊन चर्चा
आठवडाभरापूर्वी उडालेल्या संघर्षानंतर भारत आणि चीनमध्ये आता चर्चा होत आहे. भारतीय लष्करानेच यासंबंधी माहिती दिल्याचे एका वृत्तसंस्थेने म्हटले आहे. विशेष म्हणजे ही चर्चा सीमापार चीनच्या भूमीत होत आहे. भारत आणि चीनमध्ये गेल्या काही दिवसांपासून तणाव निर्माण झाला आहे. मागच्या सोमवारी गलवान खोर्‍यात झालेल्या संघर्षात 20 भारतीय जवान शहीद झाले. त्यानंतर चीनची मुजोरी समोर आली होती. या संघर्षात चीनचीही मोठी जिवीतहानी झाली होती. तसेच भारतातही चीनविरोधी लाट उसळली होती. आता दोन्ही देशांमध्ये सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी कमांडर पातळीवर चर्चा केली जात आहे. भारतीय लष्कराच्या सूत्रांच्या हवाल्याने एका वृत्तसंस्थेने हे वृत्त दिले आहे. त्यात म्हटलेय की, भारत आणि चीनमध्ये आता कमांडर पातळीवर चर्चा केली जात आहे. ही बैठक प्रत्यक्ष ताबारेषेच्या पलिकडे चीनच्या भूमीत मोल्डो येथे होत आहे. त्यात लडाखमधील संघर्षाबद्दल चर्चा केली जाणार आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker