मालेगाव महापालिका निवडणुकीत इस्लाम पक्षाला स्पष्ट बहुमत

Foto
 नाशिक जिल्ह्यातील मालेगाव महापालिका निवडणुकीत इस्लाम पक्षाने स्पष्ट वर्चस्व मिळवले आहे. या निवडणुकीत इस्लाम पक्षाने 35 जागांवर विजय मिळवला असून, समाजवादी पक्षाने 6 जागा जिंकल्या आहेत. मालेगाव महापालिकेची एकूण सदस्यसंख्या 84 आहे. इस्लाम पक्ष आणि समाजवादी पक्ष यांनी एकत्र येत “मालेगाव सेक्युलर फ्रंट”च्या नावाने आघाडी केली होती.  मालेगाव महानगरपालिकेच्या पूर्व भागात  इस्लाम पक्ष आणि एमआयएम यांच्यात चुरशीची लढत झाली. 

या लढतीत इस्लाम पक्षाने बाजी मारत 35 जागा जिंकल्या, तर एमआयएमने 21 जागांवर विजय मिळवला आहे. मालेगाव पश्चिम भागात शिवसेना आणि भाजप यांच्यात प्रतिष्ठेची लढाई पाहायला मिळाली. या भागात शिवसेनेने 18 जागांवर विजय मिळवला असून, भाजपला केवळ 2 जागांवर समाधान मानावे लागले आहे. या पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात मालेगाव महापालिकेतील 84 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी...

पक्षनिहाय निकाल (एकूण 84 जागा)

इस्लाम पार्टी – 35

समाजवादी पार्टी – 5

शिवसेना (शिंदे गट) – 18

एमआयएम – 21

काँग्रेस – 3

भाजप – 2