औरंगाबाद: महानगरपालिकेत पदाचा दुरुपयोग करुन विविध कामांसाठी खर्चाचा दुरुपयोग करुन भ्रष्टाचार केल्याचा आरोप करीत एमआयएमच्या वतीने आज महानगरपालिकेसमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी घोषणाबाजी करीत महापौर नंदकुमार घोेडेले यांच्या प्रतिमेला काळे फासले. दोन दिवसांपूर्वी सुभेदारी विश्रामगृहामध्ये खा. इम्तियाज जलील यांनी महानगरपालिकेत मोठ्या प्रमाणात मोठे घोटाळे झाले आहेत. त्याचबरोबर महापौर नंदकुमार घोडेले यांनी विविध कामांवर अवाढव्य खर्च केला आहे. भ्रष्टाचार केला आहे असा गंभीर आरोप केला होता. याच पार्श्वभूमीवर आज मनपासमोर एमएमआयने महापौरांच्या प्रतिमेला काळे फासले.











