आखाड्याची माती अन् पेढ्यांचा गोड इतिहास गांधी पुतळा ते अप्पा हलवाई हॅरिटेज वॉक

Foto

छत्रपती संभाजीनगर (सांजवार्ता ब्यूरो): शहराच्या हृदयात वसलेल्या शहागंज, सराफा, धावणी मोहल्ला आणि पानदरीबा परिसराचा रंजक इतिहास उलगडणारा विशेष हेरिटेज वॉक नुकताच उत्साहात पार पडला. निमित्तही तितकेच खास होते; शहागंज येथील ऐतिहासिक गांधी पुतळ्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाची सुरुवात आणि शीख पंथाचे आदरणीय भाई दयासिंहजी यांचे ३६५ वे जयंती वर्ष, या दुग्धशर्करा योगायोगामुळे या वॉकला एक वेगळीच उंची लाभली. इतिहासाच्या पाऊलखुणा शोधत निघालेला हा जत्था जेव्हा शहराच्या गजबजलेल्या जुन्या भागातून फिरला, तेव्हा शतकांपूर्वीचे वैभव डोळ्यांसमोर जिवंत झाले. या
बाखरिया आखाडा
या वॉकचा सर्वात वेगळा अनुभव ठरला तो म्हणजे उस्ताद बाबूलालजी बाखरिया यांच्या कुस्ती आखाड्याला दिलेली भेट. लाल मातीचा सुवास आणि अंगात संचारणारे स्फुरण घेऊन सर्व इतिहासप्रेमी या ऐतिहासिक आखाड्यात पोहोचले. यावेळी ऐश्वर्या बाखरिया यांनी उपस्थितांशी संवाद साधताना आखाड्याचा इतिहास ओघवत्या आणि प्रभावी भाषेत मांडला. त्यांनी कुस्तीच्या आखाड्यातील वैशिष्ट्ये, डावपेच, लाल मातीची महती आणि बाखरिया उस्तादांची गौरवशाली परंपरा समजावून सांगितली. त्यांच्या अभ्यासपूर्ण सादरीकरणामुळे जुन्या मल्लांचे पराक्रम उपस्थितांच्या डोळ्यांसमोर हुबेहूब उभे राहिले.
वारसा जपणे प्रत्येकाची जबाबदारी
66 छत्रपती संभाजीनगरचा इतिहास, संस्कृती आणि वारसा ही आपल्या शहराची खरी ओळख आहे. हेरिटेज वॉकसारख्या उपक्रमांमुळे नव्या पिढीला आपल्या शहराचा समृद्ध इतिहास प्रत्यक्ष अनुभवता येतो. वारसा जपणे ही केवळ प्रशासनाची नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे.
- समीर राजूरकर, महापौर
सफारी दरम्यान इतिहासप्रेमींनी खालील प्रमुख ऐतिहासिक व धार्मिक ठिकाणांना भेटी दिल्या.