फरार लाचखोर पोलिसाने ढाब्यावरील मोबाईल केला लंपास

Foto
लाचेची रक्कम स्वीकारताना एसीबीच्या पथकाचा छापा पडला असताना तेथून रक्कम घेऊन पसार झालेल्या पोलीस कर्मचार्‍याने वरूडकाझी मार्गावरील दुधड येथील ढाबा चालकांचा मोबाईल घेऊन पळ काढण्याचा प्रकार विश्वसनीय सूत्रांच्या माहितीने समोर आला आहे.कॉल करण्याच्या बहाण्याने त्याने मोबाईल घेतला होता.तेंव्हा पासून तो फरार आहे.
12 जून रोजी ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातिल रामेश्वर कैलास चेडेकर व अनिल रघुनाथ जायभाय या दोन पोलीस शिपायांना हायवावर वर कारवाई न करण्यासाठी मागितलेली 30 हजाराची लाच स्वीकारताना नरेंगाव चौफुलीवर ट्रॅप करण्यात आले होते.त्यावेळी मागणी करणार्‍या शिपाई चेडेकरला पथकाने घटनस्थळीच चतृर्भुज केले.तर  लाचेची रक्कम स्वीकारणारा शिपाई जायभाय हा लाचेची रक्कम घेऊन त्याच्या बलेनो गाडीने वरूडकाझी रस्त्याच्या दिशेने पसार झाला होता. विश्वसनीय पोलीस सूत्रांच्या माहिती नुसार  त्यानंतर मोबाईल लोकेशन वरून आपण पकडले जाऊ या भीतीने शिपाई जायभाय याने  स्वतःचा मोबाईल बंद केला. तो परिसरातील एका धाब्यावर जाऊन थांबला तेथे त्याने एका व्यक्तीकडून कॉल करायचे आहे,अशी थाप  मारून त्या व्यक्तीचा मोबाईल घेऊन पोबारा केला.मोबाईल धारकला  कळताच त्याने पोलीस ठाणे गाठले मात्र तेथे गेल्यावर  एसीबी ट्रपचा संपूर्ण प्रकार समजल्यावर ती व्यक्ती औरंगाबाद येथील लाच लुचपत प्रतिबंधक कार्यालयात गेला. तेथे तो पसार असल्याचे कळाले,अशी माहिती सूत्रांनी दिली.या घटनेला आता आठवडा होत आहे. अद्याप ही शिपाई जायभाय हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. दरम्यान, या संदर्भात ग्रामीण पोलिस कसून तपास करीत आहेत. संबंधित फरार आरोपीने लवकरात लवकर पोलिसांच्या स्वाधिन व्हावे असे प्रयत्न सुरू आहेत.