एमआयएम च्या सभेला दलित नगरसेवकांची अनुपस्थिती.

Foto
औरंगाबाद: एमआयएम पक्षातील दलित नगरसेवकांना  डावलले जात असल्यामुळे नगरसेवक नाराज असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहेत. याचाच प्रत्यय कालच्या किराडपुऱ्यातील सभेत आला.सभेच्या मंचावर अनेक दलित नगरसेवक अनुपस्थित असल्याने चर्चेला उधाण आले होते.

सध्या लोकसभेचा प्रचार शिगेला पोहोचला आहे.अनेक पक्ष आपल्या पदाधिकारी-लोकप्रतिनिधींना विशेष त्या जबाबदारी देत आहे.  इतर पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकारी याना आपल्याकडे कसे ओढता येईल याचे प्रयत्न करीत आहेत. मात्र मागील काही दिवसांपासून एमआयएम पक्षात काही विपरीत वातावरण दिसत आहे.

वंचित बहुजन आघाडी कडून  एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील हे मैदानात आहेत. मात्र, जलील हे दलित नागरसेवकांना विश्वासात घेत नाहीत अशी चर्चा सुरू आहे. काही दलित नगरसेवकांच्या वार्डात कॉर्नर बैठका घेण्यात येत आहेत.मात्र याची कल्पना स्थानिक नगरसेवकांना देण्यात येत नाही. त्यामुळे आम्ही जलील यांचे काम करण्यास तयार असताना देखील आम्हला का विचारले जातात नाही असा प्रश्न  नागरसेवकांना पडला आहे.त्यामुळे अनेक नगरसेवक नाराज आहे.याचेच प्रत्यय कालच्या एमआयएमच्या सभेत आले. किराडपुरा भागात काल रात्री खा.असदुद्दीन ओवेसी यांची सभा होती.मात्र खराब हवामानामुळे त्याचे औरंगाबादेत येणे होऊ शकले नाही.त्यावेळी जलील यांनी सभेला संबोधित केले.यावेळी एमआयएम पक्षाचे मनपातील संपूर्ण नगरसेवक उपस्थित राहतील अशी अपेक्षा होती.मात्र तसे झाले नाही.मुख्यत: अनेक दलित नगरसेवक व त्यांचे कार्यकर्ते सभेच्या व्यासपीठावर दिसून आले नाही. यामुळे अनेक उलटसुलट चर्चेला उधाण आले होते. आज खा.ओवेसी शहरात दाखल होणार असून ते नाराज नागरसेवकाची नाराजी दूर करण्यात यशस्वी होतील का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.  त्यांना नाराजी दूर करण्यात अपयश आल्यास याचा मोठा फटका एमआयएम चे उमेदवार जलील यांना बसू शकतो अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker