छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : पुंडलिकनगर पोलिस ठाण्यातून एका आरोपीने पोलिसांच्या नाकावर टिच्चून पोबारा केल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी (दि. २६) घडला. आश्चर्याची बाब म्हणजे, ठाण्यातून पळून गेलेला हा चोरटा थेट घरी गेला, तिथे त्याने पोटभर जेवण केले आणि चक्क गाढ झोपलाही. यामुळे मात्र पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अभिषेक ऊर्फ भैय्या गोरखनाथ भुमकर (२१, रा. मुकुंदवाडी) असे आरोपीचे नाव असून, पोलिसांनी धावपळ करत त्याला पुन्हा घरातूनच बेड्या ठोकल्या.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ एप्रिलच्या रात्री मुकुंदवाडी रेल्वेस्थानक परिसरात एका प्रवाशाचा मोबाईल आणि बॅग हिसकावून पळून जाणाऱ्या अभिषेक भुमकर आणि त्याचा साथीदार सोमीनाथ नरोडे या दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने पाठलाग करून पकडून त्यांच्याकडून ९ हजार रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला. अटकेच्या वेळी आरोपी अभिषेक नशेत होता. गुन्हा दाखल केल्यानंतर पुढील कारवाईसाठी गुन्हे शाखेने दोघांना पुंडलिकनगर पोलिसांच्या स्वाधीन केले होते.
रविवारी मुख्यमंत्री विवाहसोहळ्यानिमित्त शहरात
नशा उतरली, भूक लागली
▶ पुंडलिकनगर पोलिसांच्या कोठडीत असलेल्या अभिषेकची काही वेळाने नशा उतरली आणि त्याला कडाडून भूक लागली. ठाण्यात कर्मचाऱ्यांची फारशी वर्दळ नाही आणि आपल्याकडे कुणाचेही लक्ष नाही, हे हेरून त्याने चलाखीने ठाण्यातून पळ काढला. विशेष म्हणजे, एका आरोपीने डोळ्यादेखत धूम ठोकूनही ड्यूटीवर असलेल्या पोलिसांना त्याचा थांगपत्ताही लागला नाही.
आले होते. व्हीआयपी बंदोबस्तासाठी शहरातील बहुतांश पोलिस यंत्रणा तैनात होती. पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात मोजकेच कर्मचारी उपस्थित होते. भूक लागल्याने आरोपीने ठाण्यातून पळ काढला. कर्तव्यात कसूर झाल्याने पोलिसांच्या पायाखालची वाळूच सरकली. त्यांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. आरोपी मुकुंदवाडीतील त्याच्या घरीच गेला असावा, या शक्यतेने पोलिसांचे पथक त्याच्या घरी पोहोचले. तिथे गेल्यावर हा पठ्ठ्या पोटभर जेवण करून घरात गाढ झोपी गेला होता. झोपेतून उठवून त्याला पुन्हा कोठडीचा रस्ता दाखवून पोलिसांनी सुटकेचा निश्वास टाकला.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions












