औरंगाबाद: मुंबई विद्यापीठाचा पदवी अभ्यासक्रमाचे निकाल अद्यापही लागलेले नाही. त्याचा परिणाम बीएड प्रवेशप्रक्रियेवर झाला आहे. बीएड प्रवेशप्रक्रिया अद्यापही सुरु झालेली नाही. दुसरीकडे मात्र विद्यार्थी प्रवेशासाठी चकरा मारत आहेत.
बीएड सीईटीचा निकाल लागूनही बीएड अभ्यासक्रम प्रवेशप्रक्रिया अद्यापही सुरु झालेली नाही. त्यामुळे प्रवेशप्रक्रिया केव्हा सुरु होणार याची विचारणा करण्यासाठी विद्यार्थी बीएड महाविद्यालयांमध्ये चकरा मारत आहेत. तसेच महाविद्यालयांनाही प्रवेश प्रक्रियेबाबत कुठल्याही सूचना वरिष्ठ स्तरावरुन देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना काय सांगावे? असाही प्रश्न महाविद्यालयांसमोर उपस्थित झाला आहे. मुंबई विद्यापीठाचे निकाल अद्यापही लागलेले नसल्याने बीएड प्रवेशप्रक्रिया अद्यापही सुरु झालेली नाही, असे सांगण्यात येत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात येत आहे. यामुळे यावर्षी बीएड प्रवेशप्रक्रिया लांबणार असल्याने शैक्षणिक वर्ष उशिरा सुरु होईल असे चित्र स्पष्ट होत आहे.