छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्यूरो) : जिल्ह्यातील सर्व नगरपालिका तसेच नगर पंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठीचे निकाल आज जाहीर झाले आहेत, यामध्ये खुलताबाद येथे काँग्रेसचे आमेर पटेल, फुलंब्री येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे राजेंद्र ठोंबरे तसेच सिल्लोड येथे शिवसेनेचे अब्दुल समीर, विद्या कापसानकर पैठण येथे शिवसेना, शिंदे. विद्या कावसानकर या विजयी झाल्या आहे. कन्नड येथे काँग्रेसच्या फरीन बेगम जावीद, गंगापूर येथे संजय जाधव राष्ट्रवादी (अजित पवार) हे निवडून आले आहेत. वैजापूर येथे भारतीय जनता पक्षाचे डॉ. दिनेश परदेशी हे निवडून आले आहेत.















