औरंगाबाद; काँग्रेस पक्षाने मंगळवारी आपल्या पक्षाचा लोकसभा निवडणुकीकरिता ‘जन आवाज’ जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यात त्यांनी शेतकरी, युवक, महिला, बेरोजगार व आरोग्य सुविधा याबाबत जनतेला थेट लाभ देण्याचे आश्वासन दिले आहे. काँग्रेसच्या या जाहीरनाम्यातील योजना जरी लाभदायक वाटप असल्या तरी सर्वसामान्य जनतेला त्या किती आवडतात व काँग्रेसला मतदान करतात का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
निवडणूक आली की, प्रत्येक राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी आपल्या पक्षाचा जाहीरनामा तयार करतो. या जाहीरनाम्यात जनतेच्या हिताच्या विविध योजना तसेच त्यांना लाभ देणार्या अनेक योजनांचा त्यात समावेश केला जातो. मतदार राजा विविध पक्षाचे जाहिरनामे वाचून आपले मत बनवितो. त्यानंतर आपले मन तो उमेदवाराला देतो. देशात काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी हे दोन्ही राष्ट्रीय पक्ष असले तरी विविध प्रादेशिक पक्ष आपल्याला मते मिळावीत, यासाठी आपल्या जाहीरनाम्यात, आश्वासनाचा भडीमार करतात. पण प्रत्यक्षात निवडून आल्यानंतर मात्र या सर्व राजकीय पक्षांना आपण दिलेल्या आश्वासनाचा विसर पडतो. जाहीरनाम्यातील २० टक्के जनतेला किमान उत्पनाची हमी न्याय योजनेतून देण्यात आली. वर्षाला ७२ हजार रुपयांचे किमान उत्पन्न मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले आहेे. या योजनेचा २५ कोटी नागरिकांना लाभ मिळणार असल्याचे सांगण्यात आले. युवकांना आकर्षित करण्यासाठी उद्योग, व्यवसायासाठी थेट कर्जपुरवठा याशिवाय २० लाख युवकांना शासकीय नोकरी वर्षभरात देण्यात येणार आहे. महिलांसाठी विधानसभा, लोकसभा तसेच शासकीय नोकर्यात ३३ टक्के आरक्षण देण्यावर भर देत महिलांना आकर्षित करण्याचा प्रयत्न झाला आहे. तसेच शिक्षण मोफत आरोग्य सुविधा देण्याबाबतही आश्वासन देण्यात आले. तसेच ग्रामीण भागात घर आणि घर बांधण्यासाठी ज्यांच्याकडे जमिन नाही. त्यांना भूखंड देण्यात येणार आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे शेतकर्यांना कर्जमुक्त करण्यात येणार आहे. कर्जमुक्तीसह शेतकर्याच्या मालाला हमी भाव देण्यासाठी कृषी राष्ट्रीय आयोगाची स्थापना करण्यात येईल.
तसेच ज्या शेतकर्यांनी कर्ज घेतले व ते फेडले नाही. अशावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतात. तशा प्रकारचे फौजदारी गुन्हे दाखल करण्यावर बंदी घालण्यात येणार आहे. व्यापारी आणि उद्योजकांना लाभ व्हावा, यासाठी जी एस.टी. कायद्यात सुधारणा करण्यात येणार आहे. जी एस.टी. चा लाभ नगरपंचायती आणि पालिकांना वाटा देणार आहे. याशिवाय अनेक योजनाचा जाहीरनाम्यात समावेश करण्यात आला आहे. या सर्व योजना जनहिताच्या असल्या तरी काँग्रेसचा हा ‘जन आवाज’ सर्वसामान्यपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी पक्ष कार्यकर्त्यांची आहे व निवडून आल्यास त्याची अंमलबजावणी होईल का हे पहावे लागणार आहे.