ज्ञानविकास विद्यालयाच्या आनंद नगरीत संत सावता भाजी बाजाराचे आकर्षण

Foto
 सिल्लोड, (प्रतिनिधी) भराडी येथील ज्ञानविकास विद्यालयाच्या विद्यार्थ्याच्या पुढाकाराने सावित्रीमाई फूले यांच्या जयंती निमित्ताने आनंद नगरीचे आयोजन करण्यात आले होते.

यात विद्यार्थ्यांनी फास्ट फूड, तळलेले पदार्थ टाळत ज्वारी बाजरी भाकरी पिठलं, नाचणी, कळना भाकर, दूध बासुंदी, मेथी, करडी, भाजी, पालक, चिला, चाकोत भाजी शेपू, कोथनबीर, मुळा, गाजर, बीट, तुरीच्या ओल्या शेंगा, केळी, पेरू, अंजीर आदी आरोग्य दायक पदार्थ विद्यार्थ्यांनी खरेदी विक्री करत ७९ हजाराची उलाढाल करून व्यवहाराची प्रत्यक्ष अनुभूती मिळवत नफा तोटा समीकरण समजून घेत प्रामाणिक व्यवहाराची चुणूक दाखवली.

संत सावता महाराज भाजी मंडी आनंद नगरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सावित्रीमाई फुले प्रतिमा पूजन व उदघाटणास बीट जमादार वाय. कुलकर्णी, सुनील सुसुंद्रे, कल्याणी तुपे गाडेकर, ईश्वर अग्रवाल, शालेय वाहनाचे चालक - मालक, मुख्याध्यापक शिक्षक वृंद हजर होते. शिक्षकांच्या विभागीय स्पर्धे त विज्ञान व गणिताची जादू यात मराठवाड्यातून प्रथम क्रमांक पटकविणाऱ्या कल्याणी तुपे / गाडेकर यांचा  एस. पाटील, पालकर व्हि., भडगे बी., राकडे यू.,  काकडे एस. यांच्या हस्ते सन्मान आनंद नगरीत दुकान व्यवसाय उभा करण्यासाठी पैसे भांडवल उभे करत विक्री करण्याची व पैसा वसुलीची तारेवरची कसरत व त्यातून नफा तोटा गणित विद्यार्थ्यांना समजल्यास त्यांच्या आई वडिलांचे कस्ट लक्षात येऊन विद्यार्थ्यांना अभ्यासाचे गांभीर्य लक्षात आल्याशिवाय राहणार नाही.
-अशोक गरुड,
शैक्षणिक समूहाचे प्रमुख.