सिल्लोड, (प्रतिनिधी) : स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
जयंतीनिमित्त शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमास जि. प. सदस्य अब्दुल आमेर अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी या चौकातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या नामफलकास अब्दुल आमेर अ. सत्तार यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. आमदार अब्दुल सत्तार यांचे जनसंपर्क कार्यालय, शिवसेना भवन येथे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी केली.
छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ, कृउबा समितीचे संचालक तथा नगरसेवक नंदकिशोर सहारे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख
किशोर अग्रवाल, कृउबा समितीचे संचालक शेख जावेद, चांद बेग मिर्झा, शिवसेना महिला आघाडीच्या दुर्गाबाई पवार, शकुंतलाबाई बन्सोड, मेघा शाह, शेख सलीम हुसेन, संजय मुरकुटे, जगन्नाथ कुदळ, अशोक बनसोड, मारुती वराडे, प्रभूलाल झलवार, फहिम पठाण, शिवा टोम्पे, गणेश चंदनसे, कैलास जायभाय, भाऊराव दुधे यांच्यासह शिवसैनिक, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.














