रस्ता ओलांडणाऱ्या तरुणाला एका तरुणास शहरबस ने उडविल्याची घटना आज सकाळी आकरा वाजेच्या सुमारास जलनारोड वरील एपीआय कॉर्नर उड्डाणपुलाखाली घडली.जखमीला नागरिकांनी रुग्णालयात हलविले. विजय भास्करराव म्हस्के वय २० वर्ष (रा.वैध टाकळी) असे जखमी तरुणाचे नाव आहे.
या बाबत अधिक महियी अशी की, (एम एच २० ई जी ९५५४) ही शहर बस मुकुंडवाडीहुन प्रवासी घेऊन बाबपेट्रोल पंपा कडे जात असताना. तरुण एपीआय कॉर्नर उड्डाणपुला खलील रस्ता ओलांडत असताना बस समोर आल्याने चालकाला बस वर नियंत्रण मिळविता न आल्याने अपघात झाला.या अपघातात तरुण गंभीररीत्या जखमी झाला.नागरिकांनी त्यास खाजगी रुग्णालयात हलविले मात्र तेथील डॉक्टरांनी डोक्याला गंभीर जखम असल्याने घटित जाण्याचा सल्ला दिल्याने.जखमीस घाटीत हलविले त्यावर उपचार सुरू आहे.दरम्यान अपघातामुळे रस्त्यावर गर्दीझाली होती. घटनेची माहिती मिळताच मुकुंडवाडी पोलीसानी घटनास्थळी धाव घेत. वाहतूक सुरळीत केली. दुपारपर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल झाला न्हवता. जेंव्हा बस अली तेंव्हा तरुण पळत बस कडे धावत आला होता असे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.