औरंगाबाद :शेतकर्यांसह सर्वसामान्य ज्या वरुण राजाची आतुरतेने वाट पाहत होते त्याचे अखेर कालपासून धडाक्यात आगमन झाले. काल सायंकाळी पाचच्या सुमारास अर्धा तास बरसलेला पाऊस आजही दुपारी बाराच्या सुमारास जोरदार बरसला. त्यामुळे सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे.
गेले दोन आठवडे पाऊस गायब झाल्याने सर्वत्र चिंता व्यक्त होत होती. विशेषतः शेतकरी चांगलेच हवालदिल झाले होते. मात्र शुक्रवारी सायंकाळी पावसाचे जोरदार आगमन झाले. औरंगाबाद सह फुलंब्री सिल्लोड आदी तालुक्यात चांगला पाऊस झाला. आज सकाळपासून ढगाळ वातावरण होते. त्यामुळे पाऊस बरसेल असा अंदाज होता. दुपारी बाराच्या सुमारास जोरदार पावसाचे सरी कोसळल्या. जिल्हाभर या पावसाने हजेरी लावली असल्याचे समजते. एकंदरीत चांगल्या पावसाने सर्वत्र समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.