शहराची शांतता भंग करणाऱ्यांची गय करणार नाही - पोलीस आयुक्त; मुस्लिम तरुणास जय श्रीराम बोलण्यास भाग पडल्याप्रकरणी चार संशयित ताब्यात

Foto
 


औरंगाबाद- रस्त्याने जाणाऱ्या  मुस्लिम झोमॅटो डिलिव्हरी बॉयला थांबवत चार जणांनी बळजबरीने जय श्रीराम बोलण्यास भाग पाडले.  यानंतर आझाद चौकात वातावरण तणावपूर्ण झाले होते.  या प्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात विरोधात सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले आहे. शहराची शांतता भांग करणाऱ्यांची गया केली जाणार नाही.  त्यांच्यावर  कठोर कारवाईचा इशारा पोलीस आयुक्तांनी दिला आहे.

रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास झोमॅटोमध्ये फूड डिलिव्हरी करणारा आमेर शेख आणि त्याचा मित्र  दुचाकीवरून जात असताना त्यांना एका पंढऱ्या कारमधील चार जणांनी अडविले व  त्यांच्या कडून  बळजबरीने जय  श्रीरामचे नारे लागवले. या घटने नंतर शहरातील आझाद चौकात मोठा जमाव जमला  व वातावरण तणावपूर्ण बनले होते.पोलिसांनि तातडीने आझाद चौकात जाऊन परिस्थिती शांतता पूर्ण केली आहे. तरुणाच्या तक्रारीवरून सिडको पोलीस ठाण्यात अज्ञात चार जनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आठवडयातील ही शहरातील दुसरी घटना आहे.या दोन घटनेमुळे शहरातील सामाजिक वातावरण गडुळ झाल्याचे दिसत आहे. सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस त्या चार  जणांचा शोध घेत आहे.अशी माहिती यांनी दिली आहे..

चार संशयित ताब्यात...
गुन्हा दाखल होताच पोलिसांनी सूत्रे हलवीत सिडको परिसरातील चार संशयित तरुणांना ताब्यात घेतले आहे.व सीसीटीव्हीत दिसणारी चारचाकी वाहन देखील पोलिसांनी जप्त केली आहे अशी माहिती परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त डॉ राहुल खाडे यांनी दिली आहे..

औरंगाबादकरांची सुज्ञता
मागील आठ दिवसात जय श्रीराम बोलण्यास भाग पडल्याच्या दोन घटना शहरामध्ये घडल्या आहेत.या घटनामागे असलेल्या समाज कंटकांनी शहराचा सामाजिक सलोखा बिघडविण्याचं प्रयत्न केला मात्र सुज्ञ औरंगाबादकराणी  कुठलीही हिंसा न करता हे प्रकरण कायद्याच्या चौकटीत राहून हाताळल्याने औरंगाबाद शहराची शांतता अबाधित असून या मागील समाज कंटक गजाआड आहेत..

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker