राज्यातील शाळांची अवस्था अत्यंत दयनीय... शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची दीपके यांची मागणी

Foto
लातूर : महाराष्ट्रातील शाळांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा मिळत नसतील, तर याची जबाबदारी नेमकी कोणाची?, असा सवाल उपस्थित करून शिक्षण व्यवस्थेची ही अवस्था पाहता राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे, अशी प्रतिक्रिया कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी दिली आहे.  लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील उजनी इथल्या जिल्हा परिषद शाळेला भेट दिल्यानंतर ते बोलत होते. शिक्षणमंत्र्यांनी आणि आमदारांनी स्वतःच्या मुलांना शिक्षणासाठी आधी जिल्हा परिषद शाळेत पाठविले पाहिजे, असेही ते म्हणाले.
महाराष्ट्रातील शाळांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. 

विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा मिळत नसतील तर याची जबाबदारी नेमकी कोणाची असा सवाल उपस्थित करून शिक्षण व्यवस्थेची ही अवस्था पाहता राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे, अशी प्रतिक्रिया अभिजीत दिपके यांनी दिली आहे. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातल्या उजनी येथल्या जिल्हा परिषद शाळेला भेट दिल्यानंतर ते बोलत होते आणि शिक्षण मंत्र्यांनी आणि आमदारांनी स्वतःच्या मुलांना शिक्षणासाठी आधी जिल्हा परिषद शाळेत पाठवलं पाहिजे असं देखील ते म्हणालेत. पत्रे आहेत आणखी शाळांवर? ते पत्र गळत आहेत. मुलांना बसायला बेंच नाही आहे. तर दहा वर्षात तुम्हाला तेही जमलं नसेल तर मग तुम्ही केलं काय? दादा भुसेंनी राजीनामा दिला पाहिजे, शाळेची अवस्था बघून तर मला नाही वाटत नाही त्यांनी या पदावर राहावं, राजीनामा दिला पाहिजे, राजीनामा दिलाच पाहिजे कारण की, शाळांची अवस्था बघून तर मला नाही वाटत की, शिक्षण मंत्री कोणी असलं पाहिजे आणि जर त्यांना शिक्षण मंत्री बनायचं असेल, बनवून राहायचं असेल स्वतःच्या मुलांना उद्यापासून सरकारी शाळेत पाठवा, त्या अवस्थेत तुमच्या मुलांनाही शिकू द्या असंही पुढे दिपकेंनी म्हटलं आहे.

औसाच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत खाजगी शाळेचे विद्यार्थी देखील आढळून आले. अभिजीत दिपकेंच्या समोरच विद्यार्थ्यांनी याबाबतची कबुली दिली आहे. औसा शहरात असलेली जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा येथे  खासगी शाळा पीपल्स प्रायमरी स्कूलचे विद्यार्थी आढळून आले आहेत. स्कूल ठीक करो अभियानांतर्गत अभिजीत दिपके यांनी सुरू केलेल्या अभियानात ही माहिती आढळून आलेली आहे.

स्कूल ठीक करोफ अभियानाच्या माध्यमातून लातूर जिल्ह्याच्या दौर्‍यावर असलेले कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी औसा तालुक्यातील उजनी येथील जिल्हा परिषद शाळेला भेट दिली. यावेळी शाळेतील विविध समस्यांचा ग्रामस्थांकडून आढावा घेण्यात आला. शाळेच्या संरक्षक भिंतीसह शौचालयासाठी निधी मंजूर झालेला असतानाही मागील पाच वर्षांपासून काम सुरू झाले नसल्याची माहिती ग्रामस्थांनी दिपके यांना दिली. यानंतर त्यांनी उजनीच्या ग्रामसेवकांना फोन करून निधी आणि रखडलेल्या कामाबाबत विचारणा केली. यावेळी ग्रामसेवकांनी चिडून उत्तर दिल्याचा समोर आले आहे. यानंतर ग्रामस्थांनी शाळेतील मूलभूत सुविधांसह विविध अडचणी अभिजीत दिपके यांच्यासमोर मांडल्या. संबंधित अधिकारी आणि प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही प्रश्न सुटत नसल्याची नाराजी ग्रामस्थांनी व्यक्त केली. आपल्या न्याय हक्कासाठी नागरिकांनी लढा दिला नाही, तर अधिकारी मुजोर होत जातात अशी भावना अभिजीत दिपके यांनी व्यक्त केली.