तपासणीसाठी गुन्हेगार घाटीत अन् चरसची गोळी खिशात !

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) नशेच्या सिरपचे रॅकेट चालवणारा आणि मोक्काअंतर्गत कारवाई झालेला कुख्यात गुंड सय्यद फैजल ऊर्फ तेजा याच्या मुजोरीचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी टक्कल करून भरबाजारात धिंड काढल्यानंतरही त्याची ड्रग्जची नशा अजून उतरलेली नसल्याचे उघड झाले आहे. तपासणीच्या बहाण्याने घाटी रुग्णालयात गेलेला तेजा चक्क चरसची गोळी आणि बन (पाव) सोबत घेऊन थेट हर्सल कारागृहात पोहोचला. मुख्य गेटवरील कडक तपासणीत १९ मे रोजी
हा प्रकार उघडकीस आल्याने कारागृह प्रशासनासह पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी तेजाविरुद्ध हसूल ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याला २४ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सय्यद फैजल ऊर्फ तेजा सय्यद एजाज हा कुख्यात गुन्हेगार आहे. त्याने मैत्रिणीवर गोळीबार केल्याचा गंभीर प्रकार गतवर्षी घडला होता. त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतरही त्याचा माज कायम असल्यामुळे पोलिसांनी थेट टक्कल करून विविध भागात
असा घडला प्रकार
▶ हर्मूल कारागृहातून कुठल्याही आरोपीला तपासणीसाठी किंवा न्यायालयीन कामासाठी जायचे असल्यास मुख्यालयातील पोलीसांचे एक पथक (आरोपी पार्टी पोलीस) घेऊन जाते. १९ मे रोजी असेच एक पथक तेजाला वैद्यकीय तपासणीसाठी घाटीत घेऊन गेले. तेथे औषधोपचार घेतल्यावर दुपारी १.४५ वाजता त्याला पुन्हा हसूल कारागृहात नेले. तेथे अंगझडती कक्षात त्याची झडती घेतली असता अंतर्वस्त्रात चरसची गोळी आढळली. गोळीचे वजन १५.३६० ग्रॅम इतके भरले. अधिक चौकशीत त्याने पोलिसांची नजर चुकवून ही गोळी आणल्याची कबुली दिली. त्यानंतर कारागृहातील हवालदार सुरेश निवारे यांच्या तक्रारीवरून हर्मूल कारागृहात गुन्हा दाखल करण्यात आला.
त्याची धिंड काढली होती. तेजाविरुद्ध सिरप सिंडिकेट चालवतो म्हणून पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी थेट
मोक्कानुसार कारवाई केली. सध्या तो हर्सल कारागृहात आहे. मात्र तेथेही त्याची ड्रग्जची नशा काही उतरलेली नाही.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions