तेराशे गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी...

Foto
महसूल विभागाने केलेल्या पाहणीतून समोर
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): खरीप हंगामाची नजर अंदाज (अंदाजित) पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे. यात जिल्ह्यातील सर्वच म्हणजे १ हजार ३५४ गावांची पैसेवारी ही ५० पैशांपेक्षा कमी आढळून
आली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या सूत्रांनी दिली.
दरवर्षी महसूल यंत्रणेच्यामार्फत सप्टेंबर महिन्याच्या शेवटी किंवा १ ऑक्टोबर रोजी खरीप हंगामाची नजर अंदाज (अंदाजित)
जिल्ह्यातील १ हजार ३५४ गावांमध्ये पैसेवारीची मोजणी 66 झाली. यात सर्वच म्हणजे १ हजार ३५४ गावांत ५० टक्क्यापेक्षा कमी पैसेवारी आढळून आली. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील १९ गावांचा समावेश महापालिका हद्दीत असल्याने तसेच पैठण तालुक्यातील एकूण गावांची संख्या १९३ असून, त्यापैकी ४ गावे ही पालिका क्षेत्रात असल्याने या गावांची पैसेवारी जाहीर करण्यात आली नाही. तर गंगापूर तालुक्यात एकूण २२६ गावे आहेत, यापैकी चार गावे जायकवाडी प्रकल्पात संपादित असल्याने २२२ गावांची पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे.
पैसेवारी जाहीर केली जाते. त्यानुसार, जिल्ह्यातील २०२६-२७ खरीप अंतिम पैसवारी जाहीर करण्यात आली. जून महिन्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने पेरण्या लांबणीवर पडल्या होत्या; त्यानंतर पेरा झाल्यावरदेखील अपवाद
वगळता सर्वदूर दमदार पाऊस झाला नाही. पिके वाढीच्या अवस्थेत असतानाच पावसाने मोठा खंड दिला. परिणामी, पिकांना मोठा फटका बसला, उत्पन्न घटल्याचे महसूल विभागाने केलेल्या पैसेवारीमधून समोर आले आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions