बुद्ध जयंतीनिमित्त सिद्धार्थ उद्यानात गर्दी !

Foto

औरंगाबाद: तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या 2563 व्या जयंतीनिमित्त आज शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आज सिद्धार्थ उद्यानात भगवान गौतम बुद्ध यांच्या मृर्तीला अभिवादन करण्यासाठी बौद्ध उपासक-उपासिकांची मोठी गर्दी झाली होती.आज सकाळी सिद्धार्थ उद्यानात पंचशील ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर बुध्द वंदना घेण्यात आली आणि उपस्थित उपासक व उपासिकांना भन्तेजींनी धम्मदेशना दिली. यावेळी उद्यानातील बुद्ध मूर्तीला अभिवादन करण्यात आले. शहरातील विविध भागात बुद्ध पौर्णिमेनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आले. विविध भागात मिरवणुका काढण्यात आल्या. सकाळी क्रांती चौकातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीचा समारोप सिद्धार्थ उद्यानात करण्यात आला. बुद्ध जयंतीनिमित्त कलावंतांनी