भाषाशुद्धीकरणाची आजही नितांत गरज
राजेंद शहापूरकर / सांजवार्ता ऑनलाईन Feb 26, 2020
औरंगाबाद :- स्वातंत्र्यवीर विनायक दामोधर सावकर यांची आज पुण्यतिथी 26 फेब्रुवारी 1966 रोजी सकाळी 10.10 वाजता स्वातंयवीर सावकरांनी आपली संघर्षमय जीवन यात्रा संपविली. एक धगधगते अग्नीकुंड लिमाले27 फेबु्रवारीपासून मराठी भाषा सप्ताह सुरू होत आहे. सावरकारांनी क्रांतीकारी चळवळीपासून ते समाजसुधारनेपर्यंत अनेक क्षेत्रात आपले अतुलनीय योगदान दिले आहे. त्याबरोबर मराठी भाषा समृद्ध व्हावी त्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याला दुर्लक्षित करता येणार नाही. मराठी भाषा प्रेमिंनी किमान मराठी भाषा सप्ताहाच्या पूर्व संध्येला सावरकरांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे आवश्यक आहे. सावरकरांनी वापरातील इग्रजी शब्द दूर करून त्याला दिलेले मराठी प्रतिरूप पाहिले तरी त्यांच्या भाषा विषयक अगम्य ज्ञानाचा परिचय होतो. महापौर, अर्थसंकल्प, दूर दर्शन या शब्दाची निर्मीती सावरकरांनी केलेली आहे, हे कदाचित मराठी माणसाला माहितीही नसेल. त्यांची ही मराठी भाषा चळवळ खूप गाजली.आज मराठी माणसाला, मराठी माणसाशी, मराठी भाषेत बोलायला लाज वाटते, ही दुर्दैवी वस्तुस्थिती आपण महाराष्ट्रात अनुभवत आहोत. ‘ यू नो ’ , ‘ यू सी ‘ हे शब्द मराठी वाक्यात आले नाहीत, असं होत नसतं. अशा परिस्थितीत, काही राजकारणी मंडळी मराठी माणसामधलं मराठीप्रेम जागवण्याचा प्रयत्न करतायत, पण त्याहीपेक्षा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी मांडलेल्या भाषाशुद्धीच्या विचाराचा आज विचार व्हायला हवाय संवादाचं माध्यम आणि अभिव्यक्त होण्यासाठीचं साधन, म्हणजेच भाषा का ? तर, नाही. भाषा ही संस्कृतीचं द्योतक असते, संस्कृतीची वाहक असते. संस्कारातून संस्कृती घडत असते आणि म्हणूनच भाषेतून संस्कारही प्रतीत होत असतात. पण अनेक शतकं मराठी भाषेवर आक्रमणं होत होती. त्या काळात अनेक परकीय शब्द मराठी भाषेत समाविष्ट झाले. हवा, जमीन, वकील, गरीब, सराफ, मसाला, हलवा, गुलकंद, बर्फी, अत्तर, तवा, हे शब्द मराठी नाहीत, ते अरबी आणि फारशी भाषेतून आलेत हे आज सांगितल्याशिवाय अनेकांना कळणारही नाही. या संकरामुळे मराठी भाषा समृद्ध झाली, असं अनेकांना वाटतं. आजही इंग्रजी शब्द मराठीत आल्यानं मराठी संपन्न झाली, असंच भाषातज्ज्ञही म्हणतात. पण, सावरकरांना हे मत मान्य नव्हतं. 1924 मध्ये केसरीतून त्यांनी मराठी भाषेचे शुद्धिकरण ही लेखमाला लिहिली, त्यात त्यांनी आपली भूमिका ठामपणे मांडली होती.