छत्रपती संभाजीनगर- निवडणूक आयोगाचा निवडणुका रद्द करण्याचा निर्णय अत्यंत चुकीचा आहे अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक आयोगावर टीका केली . या निर्णयानंतर विविध जिल्हाधिकार्यांनी निवडणूक आयोगाला कळवून नाराजी व्यक्त केली. या संदर्भात लवकरच आम्ही निवडणूक आयोगाला निवेदन देणार आहोत, असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. नगर परिषद निवडणूक प्रचार दौर्यावर जाण्यासाठी मुख्यमंत्री येथे मुक्कामी आले होते.
जिल्ह्यातील फुलंब्री नगर पंचायतीची निवडणूक प्रक्रिया रविवारी पुढे ढकलण्यात आली. राज्य निवडणूक आयोगाची राज्यातील सर्व जिल्हा प्रशासनासोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली. सायंकाळपर्यंत आयोगाकडून काहीही सूचना आलेल्या नव्हत्या. त्यामुळे वरिष्ठांकडून काही अभिप्रायासह विचारणा केल्यानंतर कोर्टाने जो निकाल दिला आहे, त्यानुसार काही निवडणुका स्थगित होणार आहेत. त्यानुसारच फुलंब्रीची निवडणूक प्रक्रिया स्थगित केली. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार ४ तारखेला नव्याने फुलंब्रीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाईल. इतर नगरपालिकेच्या काही प्रभागांतील निवडणूक प्रक्रिया स्थगित केलेली आहे. उर्वरित नगरपालिकांच्या निवडणुका ठरलेल्या वेळापत्रकानुसार होतील असं निवडणूक निर्णय तथा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले.
कोणी सत्तेत आहे, कोणी सत्तेबाहेर आहे यावरुन रेड ठरत नाही. एखादी तक्रार आली, आमच्या कार्यकर्त्या संदर्भात तक्रार आली तरी कारवाई होते. अनेक वेळ माझी देखील गाडी तपासली जाते. सत्ताधारी, विरोधक अशा कुठल्या गोष्टी यामध्ये नसतातफफ असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. काही निवडणुका अचानक रद्द करण्यात आल्या आहेत. उद्या मतदान आणि काल निवडणुका रद्द झाल्या. त्यामुळे कार्यकर्ते निराश झाले, यावर देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आले. निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावला आहे. या निवडणुका रद्द करणं अत्यंत चुकीच आहे. अशा पद्धतीने कोणीतरी कोर्टात जाईल आणि निवडणूक पुढे ढकलली जाईल असं आजपर्यंत कधी झालं नव्हतंफफ असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. ङ्गङ्घनिवडणूक आयोग कुठला कायदा काढतय, कोणाचा सल्ला घेतय मला माहित नाही. जेवढा माझा कायद्याचा अभ्यास आहे, मी अनेक वकिलांशी बोललो, अशा पद्धतीने निवडणुका एखादा व्यक्ती कोर्टात गेला म्हणून पुढे ढकलता येत नाहीतफफ असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
निलंग्याच उदहारण घ्या, मी संभाजी पाटील निलंगेकर यांच्याशी बोललो. सर्व प्रक्रिया पूर्ण झालेली. कोणा एकाचा फॉर्म रद्द झाला, तो कोर्टात गेला. कोर्टाने त्याचा फॉर्म रिजेक्ट केला. ज्यांनी फॉर्म भरला त्यांना प्रचाराला पूर्ण वेळ मिळाला. कोणातरी पार्टी केलं होतं, म्हणून निवडणूक पुढे ढकलणं चुकीचं आहे. अर्थात निवडणूक आयोग स्वायत्त आहेफफ असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. ङ्गङ्घनिवडणूक घेण्याचा त्यांना अधिकार आहे. कायदेशीररित्या निवडणूक आयोगाने निवडणुका पुढे ढकलण चुकीच आहे. ज्या उमेदवारांनी प्रामाणिकपणे गोष्टी केल्या. ज्या कार्यकर्त्यांनी मेहनत केली त्यांच्यासाठी हे अत्यंत चुकीच आहे. आम्ही या संदर्भात निवडणूक आयोगाला एक रिप्रेझेंटेशन देऊफफ असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
निवडणुका पुढे ढकलणं चुकीच होतं, नगरविकास विभागाचा यात संबंध नाहीय. हा निवडणूक आयोगाचा निर्णय आहे. कलेक्टर्सनी त्यांचं मत मांडलं. त्यांनी घेतलेला निर्णय तो मान्य करावा लागेल पण तो निर्णय चुकीचा आहेफफ असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं. भाजपने एक सर्वे केलाय, त्यानुसार ७५ नगराध्यक्ष निवडून येतील असा प्रश्न एका पत्रकाराने विचारलं. त्यावर फडणवीस यांनी असा काही सर्वे झाल्याचं आपल्याला माहित नाही. पण भाजप नंबर १ चा पक्ष आहे. आमचे मित्र पक्ष त्या खालोखाल राहतील











