कोविड सेंटरचा दरवाजा कोसळला

Foto
किलेअर्क परिसरातील घटना स रुग्ण थोडक्यात बचावले
महानगरपालिकेच्या वतीने शहरात सुरू करण्यात आलेल्या विविध कोविड सेंटर्समध्ये 4 हजारांपेक्षा अधिक सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर उपचार सुरु आहेत. याठिकाणी खोलीत असलेल्या  महिला व तिच्या मुलीवर हा दरवाजा थोडक्यात पडता पडता राहिला. मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. 
किलेअर्क येथील समाजकल्याण बॉईज हॉस्टेल याठिकाणी भरती झालेल्या आई व मुलीला पहिल्यांदा दिलेली खोली कोपर्‍यात असल्याने दुसर्‍या खोलीत शिफ्ट केले. या खोलीत देखील दरवाज्याचा अर्धा भाग अचानकच कोसळला. यावेळी काही अंतरावरच उभ्या असलेल्या महिलेच्या अंगावर दरवाजा पडला असता. या घटनेने घाबरलेल्या महिला व तिच्या मुलीला पुन्हा तिसर्‍या खोलीत शिफ्ट केले. तिसर्‍या खोलीतही अस्वच्छता असल्यामुळे त्यांना पुन्हा चौथ्यांदा खोली बदलावी लागली. सिपेट कोविड सेंटर चर्चेत आल्याने त्याठिकाणी जेवणाचा दर्जा सुधारला मात्र आजही अनेक सेंटरमध्ये जेवणाचा दर्जा अतिशय खालावलेला आहे.या समाजकल्याणच्या कोविड सेंटरमध्ये देखील कच्चा भात, चपात्या आणि अतिशय तिखट स्वरुपाच्या भाज्या जेवणात मिळत असल्याचे रुग्णांच्या नातेवाईकांनी ’ सांजवार्ता ’ शी बोलतांना सांगितले.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker