छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) पुरुषोत्तम मासाच्या पावन निमित्ताने आयोजित सात दिवसीय मर्यादा पुरुषोत्तम श्री राम कथा ऐतिहासिक करण्यासाठी जागतिक ख्यातीचे भागवत प्रवचक लालगोविंद दासजी यांचे शहरात आगमन झाल्यानंतर समितीतर्फे स्वागत करण्यात आले. १५ ते २१ मे दरम्यान जालना रोडवरील इस्कॉन वी. ई. सी. सी. निर्माणाधीन मंदिर प्रांगणात होणाऱ्या या कथेमुळे पुरुषोत्तम मासात भक्तांना कथेचा लाभघेता येणार आहे.
श्री राम कथा सेवा समितीचे मुख्य सल्लागार राजेंद्र दर्डा, डॉ. सुशील भारुका, समिती अध्यक्ष एन. के. गुप्ता, कार्यकारी अध्यक्ष राजकुमार अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण टीम तयारी करत आहेत. यासाठी राजेश भारुका, सचिव जगदीश अग्रवाल, कोषाध्यक्ष गोविंद गोयल, रुक्मिणी रमण प्रभू यांच्यासह सर्व उपाध्यक्ष, संयुक्त सचिव व समन्वयक नियमित बैठका घेऊन व्यवस्थेची जबाबदारी सांभाळत आहेत. समितीचे समन्वयक डॉ. विशाल लदनिया यांनी
सांगितले की, दररोज हजारो भाविकांसाठी महाप्रसाद, पार्किंग, बसण्याची व्यवस्था आणि सुरक्षेच्या दृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. यासाठी मुख्य यजमान राजकुमार अग्रवाल, राजेश भारुका, एन.के. गुप्ता, डॉ. पुरुषोत्तम अग्रवाल, ओमप्रकाश गोयल आणि गोपाल अग्रवाल या मुख्य यजमानासह सीताराम अग्रवाल, अनिल पटेल, राजेंद्र माहेश्वरी, अनिल मुनोत, आशिष अग्रवाल, आशिष भारुका, कपिल पटेल, जीतू पटेल, संदीप नाथानी, नितिन बागडिया, रमेश नागपाल, मनोज बजाज, गिरधर संगारिया, सखाराम चादरें, आनंद भारुका सह आदी सेवेत सहभागी झाले आहेत.
१५ मे रोजी प्रभू अवताराचे कारण या प्रसंगाने कथेला प्रारंभ होणार असून २१ मे रोजी राज्याभिषेक आणि महाप्रसादाने समारोप होणार आहे. कथा दररोज दुपारी ४.३० ते सायंकाळी ७.३० या वेळेत होणार आहे. अध्यक्ष एन.के. गुप्ता म्हणाले, पुरुषोत्तम मासाचा हा दुर्मीळ योग आहे. शहरवासीयाने कुटुंबासह उपस्थित राहून लाभघ्यावा, असे आवाहन यावेळी केले.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions












