छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : एसटी महामंडळातील कर्मचार्यांच्या वेतनवाढीसाठी परिवहन खात्याने ३२५ कोटींची अर्थखात्याकडे मागणी केली आहे. मात्र, ती फाईल अर्थखात्यात तशीच पडून आहे. याबाबत परिवहन खात्याने दखल घेत पाठपुरावा केला. तर दुसरीकडे एसटी महामंडळातील कर्मचारी वेतनवाढ, फरक रक्कमेचा हप्ता मिळाला नाही तर त्यासाठी २४ फेब्रुवारीला आंदोलन करण्यावर ठाम आहेत.
२३ तारखेला महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे अध्यक्ष श्रीरंग बरगे यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्याबैठकीत काय आश्वास मिळणार यावर बरेच काही अवलंबूत आहे.













