एका पोलीस हवालदाराचा आज कोरोनाने मृत्यू झाला. त्यामुळे चोवीस तास डोळ्यात तेल घालून कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस दलाला आज मोठा धक्का बसला. सातारा परिसरात राहणारे ४८ वर्षीय पोलीस हवालदार
उस्मानपुरा विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त यांच्या कार्यालयात कर्तव्यावर होते. पाच ते सहा दिवसापूर्वी त्यांना सर्दी-खोकला, ताप आदीचा त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची कोरोनाची टेस्ट केली असता अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. गेल्या तीन दिवसापासून त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार करण्यात येत होते. उपचारादरम्यान यांची प्रकृती खालावली. आज त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
दरम्यान, कोरोनामुळे पोलिस कर्मचाऱ्यांचा मृत्यू होण्याची ही शहरातील पहिलीच घटना आहे. यापूर्वी एका पोलिस निरीक्षकासह सुमारे २० कर्मचऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. उपचारानंतर ते सर्व अधिकारी व कर्मचारी बरे होवून घरी परतले आहेत. या घटनेने पोलीस दलात मात्र एकच खळबळ उडाली आहे.













