विजयाचा उन्माद, नाचविली तलवार, पदमपुरा भागातील प्रकार

Foto
छत्रपती संभाजीनगर,(सांजवार्ता ब्युरो) ः अटीतटीच्या लढतीत विजय मिळविलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराने विजयी मिरवणूकीत चक्क तलवार नाचविल्याची घटना पदमपुरा भागात घडली. विजयाच्या या उन्मादाने परिसरात घबराट पसरली होती. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. महापालिका निवडणुकीचे काल निकाल लागले. 

शहरात विजयी उमेदवारांनी जल्लोष करीत विजयी मिरवणुका काढल्या. पदमपुरा भागातील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार अभिजित जीवनवाल यांनीही विजयी मिरवणूक काढली. यावेळी जीवनवाल यांनी चक्कल तलवार उपसत जल्लोष केला. पराभूत उमेदवाराच्या घरासमोरच तलवार उपसल्याने या भागात प्रचंड तणाव निर्माण झाला. तर पराभूत उमेदवाराच्या घरातील सदस्य भयभीत झाले. यावेळी महिला भयभीत झाल्या होत्या. अनेक महिलांनी माध्यमासमोर आपबिती सांगितली. याप्रकरणी पोलिस ठाण्यात अद्याप तक्रार दिली नव्हती.