तरुणीने अपहरण करून अल्पवयीन मुलाशी केले लग्न

Foto

मुंबई- मुंबई पोलिसांनी २२ वर्षांच्या महिलेला १७  वर्षांच्या अल्पवयीन मुलाशी लग्न केल्याप्रकरणी अटक केली आहे. बाल अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पॉक्सो) या महिलेवर कारवाई करण्यात आली आहे. तर महिलेने त्या मुलाशी वर्षभरापूर्वीच लग्न केल्याचा दावा असून आम्ही संमतीनेच शरीरसंबंध ठेवले होते, असे त्या तरुणीचे म्हणणे आहे.

 

सध्या तरुणी भायखळा तुरुंगात आहे. कुर्ला पोलिसांकडे गेल्या वर्षी डिसेंबर मध्ये एका महिलेने तक्रार दिली होती. तिला १७ वर्षांचा मुलगा आहे. माझ्या मुलाचे २२  वर्षांच्या तरुणीने अपहरण करुन स्वत:च्या घरात डांबून ठेवले. तिने बळजबरीने त्याच्याशी लग्न केले.