औरंगाबाद : काही जण रेल्वेगाडीत गडबडीत रेल्वेतच किमती वस्तू असलेल्या बॅग आणि मोबाईल विसरून जातात. अशी बॅग किंमती वस्तू परत मिळेल की नाही, याची शाश्वती नसते. परंतु अनेकांमध्ये अजूनही माणुसकी शिल्लक आहे. याचे उदाहरण नुकतेच समोर आले आहे. काचीगुडा मनमाड पॅसेंजरमध्ये सापडलेली बॅग विद्यार्थीनीने परत करून प्रामाणिकपणाचे दर्शन घडविले आहे.दररोज हजारो लोक प्रवास करतात. त्यातच काहींना रेल्वेत चढण्याची तर काहींना रेल्वेतून खाली उतरण्याची घाई असते. काही जण रेल्वेतच किंमती वस्तू विसरून जातात. काही जणांना बॅग किंमती वस्तू सापडल्या तरी कुणी परत देत नाही. परंतु काचीगुडा- मनमाड पॅसेंजरमध्ये मौल्यवान वस्तू सोने असलेली बॅक महाविद्यालयीन विद्यार्थीनी व रेल्वे सेना गोल्डन ग्रुपची सदस्य श्रद्धा मनोज शर्मा हिने रेल्वे प्रवासी सेनेचे अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी यांच्या मदतीने रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक अरविंद शर्मा दिली आहे.
अशी सापडली बॅग..
श्रद्धा शर्मा ही विद्यार्थिनी काचीगुडा-मनमाड पॅसेंजरमध्ये गुरुवारी सायंकाळी लासूरकडे जात होती. श्रद्धा शर्मा हिला समोरच्या सिटवर एका महिलेची पर्स दिसली. औरंगाबादहून रेल्वे लासूरकडे निघाली असता तिच्या लक्षात आले की, बॅग कुणी तरी विसरून गेले आहे. तिने तत्काळ रेल्वे प्रवासी सेनेचे अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी यांना फोन करून सांगितले. ती बॅग तिने सोमाणी यांच्या मदतीने रेल्वे सुरक्षा बल निरीक्षक अरविंद शर्मा यांच्याकडे सुपूर्द करून प्रामाणिकपणाचे दर्शन घडविले. यात सोन्याचे झुमके, राणीहारसह आदी मौल्यवान दागिने होते.
बॅग मालकाचा रेल्वे पोलिस घेताहेत शोध!
बॅगमध्ये आधारकार्ड, पॅनकार्ड नसल्याने ही मौल्यवान वस्तूंची बॅग कुणाची आहे. याचा शोध रेल्वे सुरक्षा बलाचे प्रत्येकाने प्रामाणिकपणा दाखविला तर अनेकजण मोलमजुरी करण्यासाठी गावाहून शहरात रेल्वेने प्रतिदिन प्रवास करतात. काही जण मोलमजुरी करून घरी पैसे पाठवितात. काही जण स्वत:च गावी पैसे घेऊन रेल्वेने प्रवास करतात. परंतु काही जण रेल्वेतच बॅग विसरतात. परंतु ती सापडली तरी कुणी परत देत नाही. त्यामुळे मोलमजुरी करणार्या त्या प्रवाशाच्या मेहनतीवर पाणी फेरते. प्रत्येकाने प्रामाणिकपणा दाखविला तर सर्वसामान्य प्रवाशाला आपल्या वस्तू परत मिळू शकेल आणि त्यातून प्रामाणिकपणाचेही दर्शन घडू शकेल. त्यामुळे प्रवाशांनी माणुसकी म्हणून सापडलेल्या वस्तू रेल्वे पोलिसांकडे द्यायला हव्यात. प्रवाशांना प्रामाणिकपणा कुणाच्या तरी मेहनतीचे चीज करू शकते. यातून माणुसकीचे दर्शनही घडू शकेल.