काँग्रेस का हाथ, देशद्रोहियों के साथ’

Foto
काँग्रेस का हाथ, देशद्रोहियों के साथ’
पासीघाटी: देशद्रोहाबाबतचा कायदा रद्द करण्याचे आश्‍वासन काँग्रेसने निवडणूक जाहीरनाम्यात दिले आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरुणाचल प्रदेशातील पासीघाटी येथील प्रचारसभेत बोलताना ’काँग्रेस का हाथ, देशद्रोहियों के साथ’, अशा शब्दांत काँग्रेसवर शरसंधान केले. 

काँग्रेसचा जाहीरनामा हा बनावट (ढकोसलापत्र) असल्याची टीका करून पंतप्रधान मोदी म्हणाले, एकीकडे विकासाचे कार्यक्रम देणारे सरकार आहे, तर दुसरीकडे केवळ खोटी आश्‍वासने देणारे नामदार आहेत. त्यांच्या खोट्या आश्‍वासनांप्रमाणेच त्यांचा जाहीरनामाही खोटा असल्याचे म्हणत मोदींनी काँग्रेसवर चौफेर टीका केली. 

काँग्रेसने आपल्या २००४ च्या जाहीरनाम्यात सन २००९ पर्यंत प्रत्येक घरात वीज पोहोचेल, असे आश्‍वासन दिले होते. यासाठी कार्यक्रमाची घोषणाही केली होती. मात्र, २०१४ मध्ये आम्ही सत्तेत आल्यानंतर देशातील १८ हजार गावांमध्ये अंधार असल्याचे स्पष्ट झाले. लाखो लोक अंधारात राहात होते. त्यानंतर २००९ मध्ये काँग्रेसने पुन्हा जाहीरनामा प्रसिद्ध केला. पहिल्या आश्‍वासनाचे काहीच उत्तर आले नाही. सन २०१४ मध्ये पुन्हा शहरांमध्ये १०० टक्के वीज जोडणी करणार, तर गावांमध्ये ९० टक्के वीज पोहोचवणार, असे आश्‍वासन दिले. मात्र, काँग्रेसने दिलेले आश्‍वासन पूर्ण केले नाही. काँग्रेसने देशात फुटीरतावाद्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, हिंसेला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच देशाला शिव्या देणार्‍यासाठी योजना तयार केली. आमचा तिरंगा जाळणार्‍यांना, ’भारत के टुकडे होंगे’चा नारा देणार्‍यांना, विदेशी शक्‍तींच्या हातचे बाहुले बनणार्‍यांना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे तोडणार्‍याना काँग्रेसचे समर्थन असल्याचा आरोप मोदींनी केला. डोळ्यात धूळ फेकत आम्ही कधीच शेतकर्‍यांकडे मते मागण्याचे काम केले नाही, तर शेतकर्‍यांसाठी सोयीसुविधा दिल्या, शेतकर्‍यांच्या कल्याणासाठी काम केले, असेही मोदी म्हणा