विहिरीतून बाहेर काढताच बिबट्या जंगलात पळाला

Foto
कन्नड, (प्रतिनिधी) : तालुक्यातील घुसूर शिवारात शनिवारी (दि. २०) सकाळी कोरड्या विहिरीत बिबट्या पडल्याची घटना उघडकीस न आली. त्याला बाहेर काढताना पिंजऱ्याच्या छतावर पाय ठेवून विहिरीबाहेर झेप घेत धूम ठोकली.

 शेतकरी तुळशीराम नलावडे यांच्या विहिरीतून बिबट्याचा आवाज येत असल्याचे नागरिकांना समजले. पोलिस बीट जमादार कैलास करवंदे यांनी वन विभागाला पाचारण केले. बिबट्याला सुरक्षित पकडण्यासाठी विहिरीत विशेष पिंजरा सोडण्यात आला. 

मात्र, बिबट्याने पिंजरा खाली पोचताच त्याने अत्यंत चपळाईने थेट पिंजऱ्याच्या छतावर पाय ठेवून विहिरीबाहेर झेप घेतली आणि जंगलाच्या दिशेने पळ काढला.