जिल्ह्यात आज सकाळी आलेल्या अहवालानुसार आणखी ७४ रुग्णांची वाढ झाली आहे. या आढळलेल्या रुग्णामध्ये सिटी एंट्री पाँइंटवरील ५ कोरोनाबाधितांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधीतांची संख्या ही १२४२१ वर जाऊन पोहचली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत १२४२१ कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यापैकी ७१७८ जण बरे होऊन घरी गेले आहेत. तर आतापर्यंत ४२६ रुग्णांचा मृत्यू झाला. तर सध्या ४८१७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
शहरात आढळले ५४ रुग्ण
शहरात ५४ रुग्ण आढळून आले आहेत. त्यात घाटी परिसर २, मुकुंदवाडी १, खोकडपुरा १, जालाननगर १, एन अकरा हडको १, पडेगाव २, रामनगर १, नारेगाव १, हनुमाननगर १, एन दोन, रामनगर ३, ब्रिजवाडी २, एन सहा सिडको १, एन एक, सिडको १, गुलमंडी १, सातारा परिसर १, एन दोन सिडको १, विठ्ठलनगर, एन दोन १, बालाजीनगर, सिंधी कॉलनी २, गजानननगर, गारखेडा १, अंबिकानगर, मुकुंदवाडी २, पुंडलिकनगर १, निशांत पार्क परिसर, बीड बायपास १, सिल्क मिल कॉलनी १, पदमपुरा ११, छावणी ८, पद्मपाणी सोसायटी २, इतर १, खडेकश्वर १, शिवशंकर कॉलनी १ या भागात रुग्ण आढळून आले आहेत.
ग्रामीण भागात १५ रुग्ण
ग्रामीण भागातील १५ रुग्ण आढळून आले आहेत. हे रुग्ण पिशोर, कन्नड १, तिसगाव २, पवार गल्ली, कन्नड २, रामपूरवाडी, कन्नड १, नांद्राबाद, खुलताबाद १, पळसवाडी, खुलताबाद १, पाचोड १, निवारा नगरी, वैजापूर १, इंगळे वस्ती, वैजापूर ४, दुर्गावाडी, वैजापूर १ या भागात आढळून आले.
सिटी एंट्री पॉइंटवर ५ रुग्ण
सिटी एंट्री पॉइंटवर ५ रुग्ण आढळून आले आहेत. त्यात बन्सीलालनगर २, सातारा परिसर १, गारखेडा १, नक्षत्रवाडी १ या भागातील कोरोनाबाधित आढळून आले आहेत.














