नाशिक : नाशिकमधील भोंदू अशोक खरात याच्या करानाम्याने राज्य हादरले आहे. त्याने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. एका पीडितेने त्याच्याविरोधात तक्रार दिल्यानंतर त्याचे बिंग फुटले. तर त्याचे अनेक राजकीय आणि सत्ताधारारी पुढाऱ्यांशी लागेबंध समोर आले आहे. त्याच्यासोबत अनेक मंत्री, आमदारांचे फोटो समोर येत असल्याने वातावरण तापले आहे. दरम्यान त्याच्या लैंगिक शोषणाचे 58 व्हिडिओ हाती लागले होते.पण हा आकडा आता वाढला आहे. त्यामुळे याप्रकरणाचे जाळे दूरपर्यंत असल्याचे समोर येत आहे.
नाशिकचा भोंदू अशोक खरात याने महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. या लैंगिक शोषणाचे 58 नाहीतर 100 पेक्षा अधिक व्हिडीओ असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. नाशकात सुरू असलेल्या च्या बैठकीतील पोलीस सूत्रांनी ही माहिती दिली आहे. खरातची झाडाझडती सुरू असून त्यातून अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहे. काल नाशिकमध्ये अजून काही पीडितांनी त्याच्याविरोधात तक्रार दिल्याचे समजते.
खरातच्या झाडाझडतीत अजून काय काय?
याप्रकरणी राज्य सरकारने खास एसआयटी स्थापन केली आहे. त्यात लैंगिक शोषणाचे 58 नाहीतर 100 पेक्षा अधिक व्हिडीओ असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. नाशकात सुरू असलेल्या च्या बैठकीतील पोलीस सूत्रांनी ही माहिती दिली आहे. नाशकात तेजस्विनी सातपुतेंच्या उपस्थित बैठक सुरू आहे. आरोपी कॅप्टन अशोक खरातवर लैंगिक शोषणाचे आरोप आहेत. खरातच्या झाडाझडतीत 2 लॅपटॉप, 8 लाखांची रोकड, पिस्तुल, जीवंत काडतुसे आणि मालमत्तांची कागदपत्रे मिळाली आहे.
नीरज जाधव मास्टरमाईंड
शिर्डी प्रकरणातील आरोपी नीरज जाधवने हे व्हिडीओ काढल्याचा संशय आहे. च्या पथकात नाशिक शहर आणि ग्रामीण पोलीस दलातील 12 वरीष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. कॅप्टन खरात प्रकरणात दाखल 3 गुन्ह्यांचा वेगाने तपास सुरू आहे. व्हिडीओतुन तांत्रिक विधीच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण करत असल्याचं समोर आले आहे. याप्रकरणात अजून पीडिता समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.