बदनामीची धमकी देऊन तरुणीवर वारंवार अत्याचार करणाऱ्या तरुणाला अटक

Foto

औरंगाबाद- ओळखीच्या महाविद्यालयीन तरुणीला बदनामी करण्याची आणि जिवे मारण्याची देऊन तिच्यावर सातत्याने अत्याचार करणाऱ्या नराधमाला पुंडलिकनगर पोलिसांनी अटक केली आहे. हनुमान भास्कर वीर (रा.हनुमान नगर, एन ३ सिडको) असे या आरोपीचे नाव आहे.

 

फेसबुकवर झाली मैत्री


पीडितेसोबत त्याची फेसबुकवर ओळख झाली. ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले. मे महिन्यात तो पीडितेला घेऊन हनुमाननगर येथील त्याच्या खोलीवर आला. तेथे त्याने तिला जिवे मारण्याची धमकी देऊन प्रथम अत्याचार केला. यावेळेस त्याने तरुणीचे फोटो काढून ते सोशल मिडियावर अपलोड करण्याची धमकी  तरुणीला दिली. यानंतर त्याने तिच्यावर पुन्हा अत्याचार केले.

 

बळजबरीने घडवून आणला गर्भपात

 

पिडिता गरोदर असल्याचे समजल्यानंतर त्याने तिला पुन्हा धमकावून बळजबरीने तिचा गर्भपात घडवून आणला. पीडितेने गर्भपात करावा, यासाठी त्याने तिला शिवीगाळ करून मारहाणही केली होती. तो सतत तिला जिवे मारण्याची धमकी देई. त्याच्याकडून होणारा त्रास दिवसेंदिवस वाढतच असल्याने पीडितेने नातेवाईकांना सांगितले. त्यानंतर नातेवाईक पीडितेला सोबत घेऊन थेट पुंडलिकनगर ठाण्यात दाखल झाले.

 

तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला ७ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker