परवापर्यंत चित्र स्पष्ट होईल, युतीबाबत देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान

Foto
छत्रपती संभाजीनगर,(सांजवार्ता ब्युरो) ः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या दौऱ्यावर महत्व प्राप्त झाले. यादरम्यान बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, स्थानिक पातळीवर युतीबाबत निर्णय होत आहेत. त्यामुळे परवापर्यंत चित्र स्पष्ट होईल. जागा वाटपवरून होतच नाही. जागा वाटप हे जिल्ह्यांमध्येच होत. यामुळे जिल्ह्यांमध्ये पक्षांनी जिथे शक्य आहे तिथे युती केली आहे. कुठे दोन पक्षांची युती झाली आहे तर कुठे कोणत्याच पक्षाची युती झालेली नाहीये. जिल्ह्यांस्तरावरील या छोट्या निवडणुका आहेत. मोठ्या निवडणुका नाहीत. ही काय राज्याची निवडणूक नाहीये, यामुळे तिथल्या तिथल्या परिस्थितीनुसार निर्णय होत असतात.

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीसांनी म्हटले की, महापालिका निवडणुकीमध्ये वेगळी निकष असतात. कारण महापालिका ही मोठी शहरे आहेत. त्यामुळे त्याठिकाणी जिथे शक्य आहे, तिथे आमची युती होणार आहे. प्रफुल पटेल यांच्या विषयावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, प्रफुल पटेल यांचा रोख कोणाकडे आहे हे शोधून काढा. आमच्याकडे नाहीये हे नक्की आहे. 

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपाच्या मराठवाड्याच्या भाजप कार्यालयाच्या उद्धाटनासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले आहेत. यादरम्यान काही पक्ष प्रवेश होणार असल्याचीही माहिती मिळतंय. देवेंद्र फडणवीस आगामी निवडणुकीमध्ये युतीबाबत स्पष्ट बोलताना दिसले आहेत. काही ठिकाणी शक्य तिथे युती झाल्या आणि जिथे शक्य नाही तिथे पक्ष वेगवेगळे लढणार असल्याचे म्हटले. आज बीड जिल्ह्यांतील अजित पवारांच्या गटातील काही कार्यकर्ते भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. योगेश क्षीरसागर यांनी आपल्या पदाचा राजीनामा नुकताच दिला.