मनपाच्या भांडार विभागाने सादर केला प्रस्ताव
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्यूरो) : महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभांमध्ये उपस्थित राहणाऱ्या सदस्य व पाहुण्यांच्या पाहुणचाराचा खर्च चांगलाच चर्चेत आला आहे. भांडार विभागाने सादर केलेल्या प्रस्तावात एका चहा-कॉफीसाठी ३८ रुपये, नाश्त्यासाठी ७० रुपये आणि जेवणाच्या एका थाळीसाठी ५९० रुपये दर निश्चित करण्यात आले आहेत. बाजारातील दरांपेक्षा हे दर कमालीचे जास्त असल्याने सामान्य माणसासाठी महागाई वाढली की प्रशासकीय उधळपट्टीसाठी? असा संतप्त सवाल आता शहरातील नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
महापालिकेच्या अर्थसंकल्पात भोजन व्यवस्था आणि इतर साहित्यांची व्यवस्था करण्यासाठी ३५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. या प्रस्तावात ७५ ते १०० ग्रॅम बिस्कीट प्रति पाकिट १८ रुपये, २०० मिली.ची पाण्याची १ बॉटल ७ रुपये असा दर दर्शविण्यात आला आहे. या खर्चास मान्यतेसाठी ३० जुलै रोजी
असा आहे मेन्यू
व्हीआयपी मेन्यूच्या दरपत्रकाने नागरिक अवाक
▶ दोन भाज्या, दाळ, साधा भात, चपात्या-पुऱ्या, गोड पदार्थ, पापड, सलाड, लोणचे. त्यासोबत फूड टेबल, हीटिंग बाउल्स यांचा मेन्यूत समावेश आहे. आवश्यक मनुष्यबळासह राउंड टेबल व आवश्यक खुर्त्यांचाही खर्च अपेक्षित आहे.
होणाऱ्या स्थायी समितीसमोर भांडार विभाग प्रस्ताव सादर करणार आहे. भांडार विभागाने
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका छत्रपती
संभाजीनगर
जेवणाच्या थाळीसाठी लावलेला ५९० रुपये दर हा शहरातील नामांकित हॉटेल्स आणि रेस्टॉरंटच्या तुलनेत एका प्लेटमागे १५० ते २०० रुपयांनी जास्तीचा लावल्याची चर्चा आहे.
पदाधिकाऱ्यांची उधळपट्टी
▶ महापालिकेत सत्ता येताच काटकसरीकडे कानाडोळा करीत युतीच्या पदाधिकाऱ्यांनी उधळपट्टी सुरू केली आहे. उदघाटन, भूमिपूजनाच्या कार्यक्रमावर लाखो रुपये खर्च होत आहेत. पदाधिकारी दालनाच्या नूतनीकरणाचा खर्च अद्याप समोर आलेला नाही. त्यात आता कपभर चहा ३८ रुपयांना, तर साधे व्हेज जेवणाची थाळी ५९० रुपयांना घेण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions












