ढोल-ताशांचा गजर अन् मानवी मनोऱ्यांचा थरार

Foto

डीजे, ढोल-ताशे, सेलिब्रिटींच्या हजेरीत दहीहंडीचा जल्लोष
स्वाभिमानी क्रीडा मंडळ
देवनील प्रतिष्ठान
छत्रपती संभाजीनगर, (सांजवातों ब्युरो) श्रीकृष्ण जन्माष्टमीनंतर गोपाळकाल्याच्या निमित्ताने संपूर्ण शहरात दहीहंडी उत्सवाचा अभूतपूर्व धरार पाहायला मिळाला. शहरातील प्रमुख चौकांत आणि गल्लीबोळांत मोठ्या उत्साहात दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. 'गोविंदा आला रे आला'च्या जयघोषात, ढोल ताशांच्या गजरात आणि डीजेच्या तालावर थिरकणाऱ्या तरुणाईच्या जल्लोषात गोविंदा पथकांनी एकावर एक थर रचत हंडी फोडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मान्यवर व सेलिब्रिटींच्या खास उपस्थितीमुळे या उत्सवाचा
उत्साह अधिकच द्विगुणित झाला होता.
दहीहंडी उत्सव केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता विविध सामाजिक संदेश देण्याचे माध्यमही ठरला. कॅनॉट परिसरात आरबी युवा मंचच्या वतीने दहीहंडीचे आयोजन करताना महिला अत्याचाराच्या विरोधात निषेध व्यक्त केला. महिलांची सुरक्षितता, त्यांच्यावरील अत्याचार रोखण्याची गरज आणि समाजाने महिलांच्या सुरक्षेसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. दहीहंडीच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न यामुळे चर्चे चा विषय ठरला.
नमो दहीहंडीला उत्स्फूर्त प्रतिसाद
* पुंडलिकनगर, बजरंग चौक आणि कैलासनगर परिसरात मंत्री अतुल सावे यांच्या मार्गदर्शनाखाली नमो दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. विविध भागांतून आलेल्या पथकांनी ढोल-ताशांच्या गजरात सलामी देत मानवी मनोरे रवण्यास सुरुवात केली. गोविंदांनी एकमेकांच्या खांद्यावर उभे राहत उंच थर रचले.
अश्वमेध क्रीडा मंडळ
नमो दहीहंडी
नमो दहीहंडी
मुकुंदवाडीत थरार
▶ मुकुंदवाडी परिसरातील सारा कासलीवाल पार्क येथे देवनिल प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गोविंदा पथकांच्या थरारक सलामी, ढोल-ताशांचा गजर, हाथी घोडा पालखी, जय कन्हैया लाल कीच्या घोषणांनी आणि तरुणाईच्या जल्लोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. धीरज वर्मा यांच्या नेतृत्वाखालील भवानी गोविंदा पथकाने पाच थरांवर दहीहंडी फोडत उपस्थितांची दाद मिळवली. कार्यक्रमाला आयोजक नगरसेवक सुनील जगताप यांच्यासह रील्स स्टार हिंदवी पाटील, महापौर समीर राजूरकर, मंत्री अतुल सावे, डॉ. भागवत कराड, स्थायी समिती सभापती अनिल मकरिये, आ. अनुराधा चव्हाण आणि किशोर शितोळे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात राजुरेश्वर ढोल-ताशा पथकाच्या दमदार वादनाने झाली. ढोल-ताशांच्या तालावर तरुणाईने जल्लोष केला.
गुलमंडीवर धमाल
▶ टीव्ही सेंटर परिसरासह शहरातील मुख्य शहरातील गुलमंडी या ठिकाणी दहीहंडीला मोठ्या संख्येने हजेरी लावत टाळ्यांनी गोविंदाचा उत्साह वाढविला, यावेळी अनेकांनी लहान मुलांना राधा, कृष्णाच्या वेशभूषा साकारून दहीहंडी महोत्सवात हजेरी लावून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी गोविंदानी थरावर थर रचत दहीहंडीला सलामी देत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.