सिल्लोड येथे अत्याधुनिक राजमाता जिजाऊ बसचे नगराध्यक्ष अब्दूल समीर यांच्या हस्ते लोकार्पण

Foto
सिल्लोड (प्रतिनिधी) :  सिल्लोड सोयगाव मतदारसंघातील प्रवाशांना सुरक्षित, आरामदायी व आधुनिक प्रवास सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आमदार अब्दुल सत्तार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून सिल्लोड आगारात दाखल झालेल्या राजमाता जिजाऊ या अत्याधुनिक बसचे लोकार्पण नगराध्यक्ष अब्दुल समीर अ. सत्तार यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.

लोकार्पणानंतर नगराध्यक्ष अब्दुल समीर अ. सत्तार यांच्यासह परिवहन विभागाचे अधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांनी नव्याने दाखल झालेल्या बसमधून शहरात प्रतीकात्मक फेरी मारली. यावेळी बसमधील आधुनिक सुविधा, आरामदायी आसनव्यवस्था, प्रशस्त अंतर्गत रचना तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या विविध सुविधांची पाहणी करण्यात आली.

या प्रसंगी नगराध्यक्ष अब्दुल समीर म्हणाले की, अत्याधुनिक बस दाखल झाल्याने प्रवाशांना अधिक दर्जेदार, सुरक्षित आणि सुखकर प्रवासाचा अनुभव मिळणार असून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत होईल. ग्रामीण व शहरी भागातील प्रवाशांना आधुनिक सुविधांसह एसटी सेवेचा लाभ मिळणे ही आनंदाची बाब असल्याचेही यावेळी त्यांनी नमूद केले. 

उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ, नगरपरिषदेतील शिवसेना गटनेते सुधाकर पाटील, नगरसेवक शेख इम्रान (गुड्डू), सुधाकर गायकवाड, परिवहन विभागाच्या विभागीय वाहतूक अधीक्षक स्वाती खाबडे, आगार प्रमुख सागरकुमार कुरील,  वाहतूक निरीक्षक सतीश अंभोरे, सरफराज पठाण, शिवसेना महिला आघाडीच्या दुर्गाबाई पवार, मेघाताई शाह, नॅशनल सहकारी सूतगिरणीचे संचालक शंकरराव खांडवे, राजेंद्र ठोंबरे, प्रशांत क्षीरसागर, युवा सेनेचे शिवा टोम्पे, सखाराम अहिरे, फहिम पठाण, राजू सुरडकर, दिलीप वाघ, आरेफ पठाण, जगदीश बेदवे, आशक शेख, भाऊसाहेब पाखरे, राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे गजानन केनेकर, पोपट मगर, अशोक काळे, नवलसिंग ठाकूर, सोमेश सपकाळ, अश्विनी सोनवणे, स्वाती डेरे, स्वाती बोराडे, संजय काळात्रे आदींसह राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे पदाधिकारी, सभासद, सिल्लोड आगारातील अधिकारी-कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अत्याधुनिक बसची वैशिष्ट्ये : 
▶ एकूण ५५ आसनी क्षमता
▶ ११ उभ्या प्रवाशांची अतिरिक्त क्षमता
▶ आरामदायी व प्रशस्त आसनव्यवस्था
▶ आधुनिक अंतर्गत रचना व आकर्षक इंटेरिअर
▶ सुरक्षित व सुखकर प्रवासासाठी आवश्यक सुविधा
▶ लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी अधिक आरामदायी व्यवस्था
▶ प्रवाशांना आधुनिक दर्जाची एसटी सेवा उपलब्ध