सिल्लोड शहरात पुरवठा विभागाकडून गॅसच्या गोडाऊनची कसून तपासणी

Foto
मागणी २ हजार सिलेंडरची, साठा आढळला १२८६; तुलनेत ७१४ सिलेंडरचा तुटवडा

सिल्लोड, (प्रतिनिधी) गॅसची टंचाई निर्माण होऊ नये कुणी सिलेंडरची ब्लॅकमध्ये विक्री करू नये, मागणीच्या तुलनेत सिलेंडरचा साठा आहे की नाही याबाबत पुरवठा विभागाकडून सिल्लोड येथील मारोती गॅस गोडाऊनची गुरुवारी दुपारी ३ वाजता तपासणी करण्यात आली यावेळी ग्राहकांची (बुकिंग) मागणी जवळपास २ हजार सिलेंडरची होती त्या तुलनेत १२८६ गॅस सिलेंडरचा साठा गोडाऊन मध्ये होता व तो ग्राहकांना वाटप करण्यात येत होता. मागणीच्या तुलनेत ७१३ सिलेंडरचा तुटवडा यावेळी जाणवला.

पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार बळीराम मुंढे यांनी अचानक शहरातील गॅस गोडाऊनवर जाऊन असलेला सिलेंडरचा साठा तपासला असता त्यांना १२८६ सिलेंडरचा साठा आढळला गुरुवार पर्यंत दोन हजार लोकांनी बुकिंग केली होती त्या तुलनेत गोडाऊनवर १२८६ सिलेंडर आढळले दररोज गॅस सिलेंडरच्या गाड्या येत आहे मागणी नुसार गॅस पुरवठा केला जात आहे कुणी विनाकारण अफवा पसरवू नये हा तपासणीचा भाग असून येथे कोणताही अनुचित प्रकार आढळला नाही अशी माहिती नायब तहसीलदार बळीराम मुंढे यांनी दिली याबाबत मारोती गॅसचे व्यवस्थापक बबन जाधव यांनी सांगितले की शहरात व ग्रामीण भागात बुकिंगसाठी लोकांनी गर्दी केली आहे.

मागणी प्रमाणे सिल्लोड शहर व ग्रामीण भागातील घाटनांद्रा, आमठाणा, बोरगाव बाजार, वांगी, धानोरा, मोढा, आळंद, वडोद बाजार येथे गॅस सिलेंडरचा पुरवठा कैला जात आहे. झालेल्या बुकिंग नुसार एजन्सी मार्फत सिलेंडर पुरवठा होत आहे गुरुवार पर्यंत जवळपास २ हजार ग्राहकांनी बुकिंग केली आहे आमच्या कडे १२८६ सिलेंडर साठा आहे. आणखी दोन दिवसात उर्वरित सिलेंडर पुरवठा होणार आहे. ग्राहकाला बुकिंग झाल्यावर दोन ते तीन दिवसात घरपोच सिलेंडर दिले जात आहे. मात्र नागरिकांनी तुटवडा निर्माण होईल या धास्तीने आगाऊ बुकिंगसाठी गर्दी केली आहे. काही लोकांचे मोबाईल नंबर बदलले आहे तर काहींची केवायसी बाकी आहे यामुळे एजन्सी जवळ गर्दी दिसत आहे.

सर्व ठिकाणी तपासणी करणार 
तालुक्यातील अजिंठा, अंभई, शिवना, सिल्लोड, भराडी येथे आशा तालुक्यात एकूण ५ एजन्सी आहेत. या सर्व ठिकाणी अचानक जाऊन तपासण्या करण्यात येणार आहे. कुणी गॅसची टंचाई निर्माण करतो का, काळ्या बाजारात घरघुती गॅस विक्री होतो का, साठा शिल्लक असताना कुणी जाणून बुजून साठा नसल्याचे दाखवतो का, घरगुती गॅसचा व्यवसायिक वापर होत आहे का, घरघुती गॅस वाहनात भरला जातो का याबाबत तालुक्यात अचानक जाऊन तपासणी करण्यात येत आहे. अजून तरी कुठे सिलेंडरचा काळा बाजार आढळला नाही.
- बळीराम मुंढे, नायब तहसीलदार, पुरवठा विभाग सिल्लोड.