वैजापूर, (प्रतिनिधी) : भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रॅक्टरने दुचाकीला धडक दिल्याने एक जण जागीच ठार झाला. हा अपघात टाकळीसागज ते कनकसागज रोडवर शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडला. भानुदास बारकू जाधव (५६, रा. टाकळीसागज) असे मृत्यू पावलेल्याचे नाव आहे.
जाधव हे त्यांच्या दुचाकीवर (एम एच ५७ ए ५८३६) जात होते. त्यावेळी ट्रॅक्टर (एमएच २० ए. एस. ७५६२) च्या चालकाने त्यांना जोराची धडक दिली. या अपघातात भानुदास यांचा उमेश भानुदास जाधव यांनी जागीच मृत्यू झाला.
या प्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालक विठ्ठल ज्ञानेश्वर जगताप, रा. बल्लाळीसागज याच्याविरुद्ध विरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक माने हे करीत आहेत.












