हर कृष्ण हर कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे हरे
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : जालना रोडवरील इस्कॉन व्ही.ई.सी.सी. मंदिर प्रांगणात श्री राम कथा सेवा समितीतर्फे आयोजित सात दिवसीय मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम कथेच्या सहाव्या दिवशी पांडालात वीर रस आणि करुण रसाचा अद्भुत संगम अनुभवायला मिळाला. विश्वविख्यात प्रवक्ते लालगोविंद दास यांनी आपल्या विलक्षण
आणि ओजस्वी शैलीत कथाप्रसंग इतक्या जिवंतपणे उभे केले की उपस्थित भाविकांच्या अंगावर अक्षरशः शहारे आले. लक्ष्मण-परशुराम संवादाने थरार उभा केला.
कथेच्या सहाव्या दिवशी प्रभुजींनी शिवधनुष्य भंगल्यानंतर राजा जनकांच्या सभेत भगवान परशुरामांच्या आगमनाचा प्रभावी आणि रोमांचकारी प्रसंग कथन केला.
व्यासपीठावरून प्रभुजींनी वीर रसाने परिपूर्ण लक्ष्मण-परशुराम संवादाचे वर्णन करताच संपूर्ण पांडाल टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेले. राजा दशरथांचा विलाप, अयोध्यावासियांचा शोक आणि प्रभू श्रीरामांनी महालाचा त्याग करून अनवाणी पायांनी वनाच्या दिशेने केलेले प्रस्थान याचे हृदयस्पर्शी वर्णन ऐकून उपस्थित हजारो भाविकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. यावेळी श्रीराम कथेचे प्रमुख यजमान म्हणून राजकुमार अग्रवाल, राजेश भारुका, एन. के. गुप्ता, डॉ. पुरुषोत्तम अग्रवाल, ओमप्रकाश गोयल, गोपाल अग्रवाल तर श्रीराम कथेचे दैनंदिन यजमान सीताराम अग्रवाल, अनिल पटेल, राजेंद्र माहेश्वरी, अनिल मुनोत, आशीष अग्रवाल, आशीष भारुका, कपिल पटेल, जीतू पटेल, संदीप नाथानी, नितीन बगडिया, रमेश नागपाल, मनोज बजाज, गिरधर संगरिया, सखाराम अर्जुनराव चादरें, आनंद भारुका यांची उपस्थिती होती.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions














