नादरपूर ग्रामपंचायतीने राबविलेल्या पाणी आडवा - जिरवा उपक्रमाचे केले कौतुक

Foto
महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम कलाकार शिवाली परब, पृथ्वीक प्रताप यांची विशेष उपस्थिती

कन्नड, (प्रतिनिधी): तालुक्यातील नादरपूर येथे आज महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम कलाकार शिवाली परब, पृथ्वीक प्रताप यांनी भेट देऊन केली मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची जनजागृती केली ग्रामपंचायतच्या वतीने जल जीवन मिशन, पाझर तलावातील गाळ काढणे, पाणी आडवा पाणी जिरवा या उपक्रमाचे तोंड भरून कौतुक केले.

 मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या जनजागृतीसाठी महाराष्ट्र फेम कलाकार शिवाली परब, पृथ्वीक प्रताप यांनी १३ मार्च २०२६ रोजी नादरपूर ग्रामपंचायतीला भेट देऊन जनजागृती केली तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने जल जीवन मिशन अंतर्गत केलेल्या कामाची पाहणी केली. ग्रामपंचायतीच्या वतीने पाझर तलावातील गाळ काढून पाणी साठवणुकीची क्षमता वाढविणे, नदीच्या दोन्ही बाजूला तयार केलेली संरक्षण भिंत या केलेल्या कामाची पाहणी केली. 

-- बागी अणि पाणी जपून वापरा ---
ग्रामपंचायतीच्या वतीने राबविण्यात आलेल्या पाणी विषयक ग्रामस्थांमध्ये जनजागृती बाबत तोंड भरून कौतुक केले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पंचायत विभाग चंद्रहार ढोकणे, पंचायत समिती सभापती सुप्रियाताई अनिल घुगे, उपसभापती माया ललित
सुराशे, पंचायत समिती सदस्य कैकश्या युसुफ पठाण, सविताताई जगन जंगले व मीनाबाई शिवाजी पाडसवान, कन्नड तालुक्याचे गट विकास अधिकारी तथा जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक डॉ. ओम प्रकाश रामावत, सहाय्यक गट विकास अधिकारी साहेबराव चव्हाण,
विस्तार अधिकारी पंचायत संतोष दारकुंडे, विस्तार अधिकारी डॉ. संजय वाघ, जिल्हा समन्वयक, वैशाली जगताप (जिल्हा समन्वयक पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर) नादरपुर सरपंचासह परिसरातील सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रा. प. सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी संघटनाचे सर्व पदाधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, महिला बचत गट संदर्भातचे सर्व तालुका स्तरीय अधिकारी, महिला बचत गट सदस्य तसेच ग्रामस्थरीय अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सदर अभियानाचे महत्व उपस्थित सर्व ग्रामस्थ व अधिकारी, कर्मचारी यांनी पटवून दिले. प्रास्ताविक सुभाष निकम यांनी तर सूत्रसंचालन लक्ष्मण बळी यांनी केले व शेवटी आभार प्रदर्शन ग्रामपंचायत अधिकारी सुभाष बनकर यांनी केले.